
Pimpri Traffic
Sakal
पिंपरी : शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (मोरवाडी) चौकात रिक्षा आणि अन्य वाहनांचे रस्त्यावरच पार्किंग केले जाते. त्यात सिग्नलची वेळ कमी असल्याने नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. अशा परिस्थितीत महापालिकेने चौकातच वाहतूक बेटाचे नियोजन केले आहे. यासाठी ब्लॉक टाकण्यात आले आहेत. त्यामुळे कोंडीत भर पडली आहे. त्यामुळे महापालिकेने हा प्रयोग करू नये, असे पत्र वाहतूक पोलिसांनी दिले आहे. मात्र, यानंतरही महापालिका प्रशासन या प्रयोगावर ठाम आहे.