railway administrative mock drillsakal
पिंपरी-चिंचवड
Pimpri News : बेगडेवाडी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेचा अपघात अन् प्रवाशांची धावपळ
पुणे-लोणावळा मार्गावरील बेगडेवाडी रेल्वे स्थानकाजवळ पेरांबूर-प्रयागराज कुंभ एक्स्प्रेसचे दोन डब्बे रेल्वे रुळावरून घसरून अपघात झाला आहे.
पिंपरी - पुणे-लोणावळा मार्गावरील बेगडेवाडी रेल्वे स्थानकाजवळ पेरांबूर-प्रयागराज कुंभ एक्स्प्रेसचे दोन डब्बे रेल्वे रुळावरून घसरून अपघात झाला आहे. यामध्ये काही प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले असल्याचा दूरध्वनी सकाळी पुणे रेल्वेच्या नियंत्रण कक्षात धडकला. त्यानंतर सर्वच यंत्रणा कामाला लागल्या.
