भोसरीतील 'त्या' विद्युत रोहित्राच्या स्फोटानंतर आज पुन्हा 'ही' घटना घडली

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 September 2020

येथील इंद्रायणीनगरातील राजवाडा इमारत क्रमांक तीनजवळील विद्युत रोहित्राचा स्फोट होऊन तीन नागरिकांना जीव गमवावा लागला.

भोसरी : येथील इंद्रायणीनगरातील राजवाडा इमारत क्रमांक तीनजवळील विद्युत रोहित्राचा स्फोट होऊन तीन नागरिकांना जीव गमवावा लागला. या इमारतीपासून अवघ्या शंभर मीटर अंतरावरील इमारत क्रमांक अकराजवळील विद्युत रोहित्राला शुक्रवारी (ता. 11) संध्याकाळी पावणेचारच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे नागरिकांची पळापळ झाली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शनिवारी (ता. 5) इंद्रायणीनगरातील राजवाड्यातील इमारत क्रमांक तीनजवळील विद्युत रोहित्राचा स्फोट झाल्याने आजी, मुलगी आणि नातीचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच राजवाड्यातीलच इमारत क्रमांक अकराजवळील विद्युत रोहित्राने पेट घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती गिरीश वाघमारे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्यावर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नागरिक माधव पन्नासे यांनी सांगितले, की विद्युत रोहित्राजवळची झाडे कापण्याच्या तोंडी सूचना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना देऊनही कापली जात नाहीत. त्याचप्रमाणे इमारतीजवळ असणारे हे विद्युत रोहित्र हटवून महापालिकेने इतरत्र ठिकाणी बसविले पाहिजे. तसेच, त्याला सुरक्षा जाळी बसविणे गरजेचे आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: transformer fire again in indrayanagar bhosari

Tags
टॉपिकस
Topic Tags: