
पिंपरी : बालवाडीतील मुलांसाठी गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेने ‘पूर्व बाल्यावस्था काळजी आणि शिक्षण’ यावर आधारित विशेष उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे बालकाची साक्षरता, अंकज्ञान आणि विविध कौशल्यांमध्ये २० ते २४ टक्क्यांनी वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. साध्या वर्गखोल्या आता खेळ आधारित शिक्षण, कथाकथन, प्रत्यक्ष अनुभव देणारे चैतन्यशील वातावरणासोबतच एकप्रकारे बालकेंद्रित ज्ञानकेंद्रांमध्ये रुपांतरित झाल्या आहेत.