esakal | वृक्षतोड दंडाच्या रकमेत दहापट वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Tree Cutting

वृक्षतोड दंडाच्या रकमेत दहापट वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - महापालिका कार्यक्षेत्रात बांधकाम (Construction) करण्यासाठी ना हरकत दाखला आवश्‍यक आहे. त्यासाठी प्रतिचौरस मीटरनुसार वृक्षसंवर्धन शुल्क (Fee) भरावे लागते. त्या रकमेत अडीचपट व वृक्षतोड दंडाच्या (Fine) रकमेत दहापट वाढ करण्याचा निर्णय महापालिका (Municipal) वृक्ष प्राधिकरण समितीने घेतला आहे. त्यामळे एका झाडासाठी आता प्रतिचौरस मीटर दहा हजार रुपये भरावे लागणार असून, वृक्षतोडीच्या दंडाची रक्कम ५० हजार रुपये झाली आहे. (Tree Cutting Fine Increase Crime)

शहरात नवीन बांधकाम चालू करण्यासाठी वृक्षसंवर्धन ना हरकत दाखला देण्यापूर्वी प्लॉटमध्ये मानांकाप्रमाणे वृक्ष असणे आवश्यक आहे. प्रति ८० चौरस मीटर क्षेत्रासाठी एक वृक्ष असे मानांक आहे. मात्र, ते नसल्यास प्रतिवृक्ष चार हजार शुल्क स्वीकारून ना हरकत दाखला दिला जात होता. नवीन वृक्षांच्या संवर्धनासाठी हे शुल्क आकारले जाते. त्याच्या रकमेत आता वाढ केली असून, चारऐवजी दहा हजार रुपये प्रति ८० चौरस मीटर क्षेत्रासाठी भरावे लागणार आहेत. तसेच, शहरात विनापरवाना वृक्षतोड किंवा छाटणी केल्यास पाच हजार रुपये दंड वसूल केला जात होता. ती रक्कम आता ५० हजार करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक झाली.

हेही वाचा: जागतिक न्याय दिनानिमीत्त 3KM चा 'द कॉमिक टेल्स' कार्यक्रम; सहभाग नोंदवा

महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन अधिनियमानुसार, झाड तोडणारी व्यक्ती किंवा संस्थेकडून प्रतिवृक्ष दंड वसूल करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे शहरातील अनधिकृत वृक्षतोड करण्यास आळा बसेल, अशी माहिती महापालिका उपायुक्त सुभाष इंगळे यांनी दिली.

१७७ झाडांबाबत तक्रारी

धोकादायक झाडे, त्यांच्या फांद्या, रस्त्याला वा घराला अडथळा अशा झाडांची छाटणी, पूर्ण काढणी व पुनर्रोपण अशा स्वरूपाच्या तब्बल १७७ झाडांबाबत ४५ जणांनी महापालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. यात सागाच्या ४० झाडांचा समावेश आहे. नारळ, जांभूळ, तबोबिया, आंबा, पारिजात, चिंच, कडुनिंब, पिंपळ, रेन ट्री, गुलमोहर, उंबर, बाभूळ, सु बाभूळ, काटे बाभूळ, बोर, कांचन, वड, नीलमोहर, बॉटलपाम, अशोक, बदाम, चिकू, आकाशनिम, चाफा, पिंपर्णी, फायकस, कॅशिया, पेल्टापोरम या देशी-विदेशी वृक्षांबाबत तक्रारी आहेत.

अशा आहेत तक्रारी

स्वरूप झाडे

पूर्ण काढणे १७१

पुनर्रोपण ४

छाटणी २

एकूण १७७

loading image