
PMRDA News
Sakal
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) वृक्षतोडीसाठी वर्षाकाठी सरासरी ४० अर्ज येत असल्याची माहिती समोर आली आहे. शेती, विकासकामे तसेच विविध शासकीय प्रकल्प राबविताना अडथळा ठरणाऱ्या झाडांबाबत संबंधितांनी अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची तपासणी करून व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच वृक्षतोडीला परवानगी दिली जात असल्याचे पीएमआरडीएने स्पष्ट केले आहे.