esakal | पिंपरी-चिंचवडमधील बारा सराईत गुन्हेगार तडीपार 
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवडमधील बारा सराईत गुन्हेगार तडीपार 
  • पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या विविध पोलिस ठाण्यातील बारा सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. 

पिंपरी-चिंचवडमधील बारा सराईत गुन्हेगार तडीपार 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या विविध पोलिस ठाण्यातील बारा सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हिंजवडी ठाण्याच्या हद्दीतील सुधाकर शिवाजी लिमकर (रा. पुनावळे), तुषार महादू बावकर (रा. मुळशी), वाकड ठाण्याच्या हद्दीतील इरफान जमशेर खान (रा. थेरगाव), स्वप्नील ऊर्फ भोऱ्या प्रकाश घाडगे (रा. म्हातोबानगर, वाकड), सुनील विश्‍वनाथ ठाकूर (रा. रहाटणी), दीपक बाळू धोत्रे (रा. निगडी), देहूरोड ठाण्याच्या हद्दीतील समीर अकबर शेख (रा. थेरगाव), शुभम उर्फ राजू राजेंद्र तरस (रा. किवळे), अमीर वाडी समीर शेख (रा. गांधीनगर, देहूरोड), सत्वील चिन्ना स्वामी (रा. देहूरोड), कोमल ऊर्फ कमल बाबू हिरेमठकर (रा. देहूरोड) तर तळेगाव दाभाडे ठाण्याच्या हद्दीतील सदानंद अरूण चव्हाण (रा. परंदवडी) यांच्यावर तडीपारची कारवाई करण्यात आली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परिमंडळ दोन अंतर्गत येणाऱ्या पोलिस ठाण्याकडून दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांचे हद्दपारीबाबतचे प्रस्ताव उपायुक्तांकडे पाठविण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार परिमंडळ दोन हद्दीतील प्रस्तावावर सहायक पोलिस आयुक्तांनी चौकशी करून अहवाल सादर केले. या प्रस्तावांपैकी गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या बारा सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्याबाबतचे आदेश परिमंडळ दोनच्या उपायुक्तांनी काढले आहेत.