
बनावट कागदपत्राच्या आधारे कुणेनामा, लोणावळा येथील सोशल वेलफेअर सेंटरची जमीन परस्पर विकण्याचा प्रयत्न करत व्यावयासिकाची सव्वा सात कोटी सव्वीस लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लोणावळा पोलिसांनी दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
लोणावळा - बनावट कागदपत्राच्या आधारे कुणेनामा, लोणावळा येथील सोशल वेलफेअर सेंटरची जमीन परस्पर विकण्याचा प्रयत्न करत व्यावयासिकाची सव्वा सात कोटी सव्वीस लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लोणावळा पोलिसांनी दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
याप्रकरणी पोलिसांनी किशोर गोपालदास ललवाणी, किशोर मंदीयानी या दोघांना अटक केली आहे. याबाबत विनय ताराचंद चावला (वय - ४१. रा. वरळी, मुबई) पोलिसात फिर्याद दिली आहे. विनय चावला याची सात कोटी सव्वीस लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याचे मेहुणे तुलसी परमानंद जसनानी यांच्यासह गौतम तुलसी जसनानी (रा. खार, मुंबई), किशोर ललवाणी (रा. बांद्रा, मुंबई), किशोर डी. मंदीयानी (रा. खार, मुंबई), महेश नरेंद्र अलीमचंदानी, शारदा महेश अलीमचंदानी (रा. लिंकीग रोड, खार) राम पी. अवस्थी (रा. फोर्ट, मुंबई). मिशेल ब्रिगॅझा, ब्रिगेड ब्रिगॅझा (रा. बांद्रा, मुंबई), विनोद मिस्त्री आणि कंपनी याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुणे नामा, लोणावळा येथील गट नं. ९८ ही पाच हेक्टर ऐंशी गुंठे ही शेतजमीन सोशल वेलफेअर सेंटरच्या नावावर व जमिनीत साधे कुळ असताना संबंधितांच्या मदतीने बनावट कागदपत्र तयार करत विनय चावला याना विकण्याचा प्रयत्न केला.
घरकाम करणाऱ्या महिलेने पावणे पाच लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला
सन २०१३ ते २०१९ या कालावधीत ७ कोटी २६ लाख रुपये लाटण्यात आले असल्याचे चावला यानी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी किशोर ललवाणी व किशोर मंदियानी यांना अटक करत वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने मंगळवार (ता.२२) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Edited By - Prashant Patil