पुणे : पवन मावळातही कोरोना पसरतोय; चांदखेडमध्ये आढळले नवे रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

पवन मावळातील एकेकाळी मुख्य बाजारपेठ म्हणून नावलौकिक असलेल्या चांदखेड गावात एकाच घरातील तीन जण कोरोनाबाधित सापडले.

बेबडओहोळ : पवन मावळातील एकेकाळी मुख्य बाजारपेठ म्हणून नावलौकिक असलेल्या चांदखेड गावात एकाच घरातील तीन जण कोरोनाबाधित सापडले. यामुळे चांदखेडमध्ये बाधित रुग्णांची संख्या तीन झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पवन मावळातील गावातही कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी चांदखेडमध्ये कोरोनाबाधित सापडलेल्या घरातील आणखी दोन जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले यातील एक चौदा, तर एक तेरा वर्षांचा मुलगा आहे. गावात तीन कोरोनाबाधित संख्या झाल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. यातील बारा जणांना तपासणीसाठी पाठवले असता दहा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले, तर दोन जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संबंधित रुग्णाच्या आई व पत्नी यांचा तपासणी अहवाल रात्रीपर्यंत कळेल, अशी माहिती आढले प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी दिलीप सूर्यवंशी यांना दिली. चांदखेड सील करण्यात आले असून, तीन किलोमीटर परीक्षेत्रातील परिसर बफर झोन म्हणून घोषित केला आहे. चांदखेडमध्ये कोरोनाबाधित सापडल्याने जवळील अनेक गावांनी चांगलाच धसका घेतला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two corona patient found in chandkhed pawan maval pune