
पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी 172 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या 92 हजार 331 झाली आहे. आज 178 जणांना डिस्चार्ज मिळाला. बरे झालेल्यांची संख्या 88 हजार 357 झाली आहे. सध्या दोन हजार 345 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील एक व बाहेरील एक अशा दोन जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 629 आणि शहराबाहेरील मृतांची संख्या 669 झाली आहे.
पिंपरी - शहरात शनिवारी 172 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या 92 हजार 331 झाली आहे. आज 178 जणांना डिस्चार्ज मिळाला. बरे झालेल्यांची संख्या 88 हजार 357 झाली आहे. सध्या दोन हजार 345 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील एक व बाहेरील एक अशा दोन जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 629 आणि शहराबाहेरील मृतांची संख्या 669 झाली आहे. सध्या महापालिका रुग्णालयांत एक हजार 29 रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार 316 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील एक हजार 241 घरांना स्वयंसेवकांनी आज भेट देऊन चार हजार 94 जणांची तपासणी केली. आज 434 जणांचे विलगीकरण करण्यात आले.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
आज पिंपरी-चिंचवड शहरातील मृत झालेली महिला दापोडी (वय 61) आणि शहराबाहेरील पुरुष हिंजवडी (वय 50) येथील रहिवासी आहेत. शहराबाहेरील रहिवासी असलेले व शहरातील महापालिका रुग्णालयांत 140 रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत शहराबाहेरील सात हजार 47 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या शहरातील रहिवासी असलेले 228 रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांत दाखल आहेत. आजपर्यंत शहरातील 70 हजार 367 जणांना विलगीकरण करण्यात आले आहे.
चोरट्यांनी दागिन्यांसह चोरले अंडरवेअर, बनियानही; बोपखेल येथील घटना
आज केलेल्या तपासणीत दोन हजार 395 संशयित रुग्ण आढळले. आजपर्यंत चार लाख 72 हजार 758 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. आज दोन हजार 110 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला. आजपर्यंत तीन लाख 78 हजार 557 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. सध्या एक हजार 870 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. आज दोन हजार 400 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत चार लाख 68 हजार 370 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Edited By - Prashant Patil