esakal | पिंपरी-चिंचवड शहरातील दोन प्रभाग ठरताहेत कोरोनाचे हॉटस्पॉट

बोलून बातमी शोधा

mumbai_covid

कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून त्यात ‘ब’ आणि ‘ड’प्रभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत

पिंपरी-चिंचवड शहरातील दोन प्रभाग ठरताहेत कोरोनाचे हॉटस्पॉट
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

पिंपरी- कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून त्यात ‘ब’ आणि ‘ड’प्रभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. यामध्ये काळेवाडी, चिंचवड, रावेत, वाकड, पिंपळे-सौदागर, ताथवडे या विभागाचा समावेश आहे. विशेष म्हणजे या सर्व ठिकाणी रुग्णसंख्या वेगाने वाढत असून ३ ते ६ एप्रिल या तीन दिवसांत चारशे ते पाचशेपर्यंत पोहोचली आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने कहर केला असून दैनंदिनस्तरावर रुग्णसंख्या अडीच हजारांवर गेली आहे.  दिवसाला २०० ते १५५ सक्रीय रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे पालिकेची चिंता अधिक वाढली आहे. त्यात यापूर्वी प्रमाणेच निगडी, प्रधिकरण, आकुर्डी, यमुनानगर, तळवडे, चिखली ही उपनगरे आघाडीवर आहेत. त्याचवेळी ‘ग’ आणि ‘ह’ प्रभागातील दापोडी, कासरवाडी, सांगवी, पिंपरी, थेरगाव, रहाटणी येथील रुग्णदुपटीचा कालावधी सगळ्यात कमी म्हणजे १०७ दिवसांवर आला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने महापालिकेची यंत्रणा तोकडी पडत असून शहरवासीय अधिकच त्रस्त झाले आहेत. रुग्णांना सध्या खाटा मिळणे दुरापास्त झाले आहे. पण, यावेळी झोपडपट्टी व चाळीव्यतिरिक्त उच्चभ्रू वस्तीत करोनाचे रुग्ण वाढत असल्याचे समोर येत आहे.

पुण्यात रेमडेसिव्हिरसाठी 'कोन्ट्रोल रुम'; गरजूंना टोल फ्री क्रमांका

१ ते १० एप्रिलपर्यंतची  क्षेत्र निहाय रुग्णसंख्या

तारीख - प्रभाग – रुग्णसंख्या
१ एप्रिल: प्रभाग अ – ३१४ , प्रभाग ब – ३९९,  प्रभाग क –२५९, प्रभाग ड –३४९, प्रभाग ई – २०५, प्रभाग फ – ३११, प्रभाग ग –१७७, प्रभाग ह –१०७.

२ एप्रिल: अ – ३२१ , प्रभाग ब – ३८४,  प्रभाग क –३२१, प्रभाग ड –३६१, प्रभाग ई – २८७, प्रभाग फ – ३०७, प्रभाग ग –२८६, प्रभाग ह –१९७.

३ एप्रिल: प्रभाग अ – ३५६ , प्रभाग ब – ४२३,  प्रभाग क –३७८, प्रभाग ड –३९९, प्रभाग ई – ३३६, प्रभाग फ – ३५५, प्रभाग ग –२९६, प्रभाग ह –२८९.

४ एप्रिल: प्रभाग अ – ५०० , प्रभाग ब – ५११,  प्रभाग क –४६९, प्रभाग ड –५३४, प्रभाग ई – ३७३, प्रभाग फ –४१२, प्रभाग ग –३८७ प्रभाग ह –१९६.

५ एप्रिल: प्रभाग अ – ३८६ , प्रभाग ब –३५६,  प्रभाग क –२८४, प्रभाग ड –३१४ प्रभाग ई – २११, प्रभाग फ -२३१, प्रभाग ग –२४१ प्रभाग ह –१२९.

६ एप्रिल: प्रभाग अ – ४१६, प्रभाग ब –४८७,  प्रभाग क –२५९, प्रभाग ड –५३३, प्रभाग ई – २४०, प्रभाग फ -३९९, प्रभाग ग –३८९ प्रभाग ह –१९१.

७ एप्रिल: प्रभाग अ – ३६७, प्रभाग ब –४५४,  प्रभाग क –२६३, प्रभाग ड –४७३, प्रभाग ई – २८१, प्रभाग फ -२६९, प्रभाग ग –३५८ प्रभाग ह –३१९.

८ एप्रिल: प्रभाग अ – २६२, प्रभाग ब –३६७,  प्रभाग क –२४०, प्रभाग ड –५२२, प्रभाग ई –२५२, प्रभाग फ -२६०, प्रभाग ग –२४७ प्रभाग ह –२०४.

९ एप्रिल: प्रभाग अ – २००, प्रभाग ब –३३५,  प्रभाग क –२११, प्रभाग ड –४१५, प्रभाग ई –१९०, प्रभाग फ -१७९, प्रभाग ग –२४१, प्रभाग ह –२३८.

१० एप्रिल: प्रभाग अ – २४५, प्रभाग ब –३४७,  प्रभाग क –२७५, प्रभाग ड –३७४, प्रभाग ई –२६१, प्रभाग फ -२६३, प्रभाग ग –२४७, प्रभाग ह –२२७.