'ते' दोघे मोटारसायकली चाेरायचे अन्...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

पुणे-नाशिक रस्त्यावर भोसरी येथे गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पोलिसांनी दोन मोटारसायकल चोरट्यांना अटक केली.

पिंपरी : पुणे-नाशिक रस्त्यावर भोसरी येथे गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पोलिसांनी दोन मोटारसायकल चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख रुपये किमतीच्या पाच मोटारसायकली जप्त केल्या आहेत. आकाश शेषराव निदनोरे (वय 19, रा. सद्‌गुरुनगर, मोशी) आणि शिवाजी गुरुनाथ हुलगे (वय 19, रा. आदर्शनगर, मोशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सहायक पोलिस निरीक्षक गणेश पाटील यांना नाशिक महामार्गावरील एका गोदामानजिक दोघेजण चोरीच्या मोटारसायकलसह येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या दोघांना सापळा रचून अटक केली.

त्यांच्याकडून सुरवातीला दोन मोटारसायकली जप्त केल्या. त्यानंतर तपासाअंती त्यांच्याकडे आणखी तीन मोटारसायकली अशा मिळून पाच मोटारसायकली जप्त केल्या. भोसरी, भोसरी एमआयडीसी आणि चाकण परिसरातून या मोटारसायकली चोरल्याची कबुली त्यांनी पोलिसांकडे दिली आहे. दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत. वाहने चोरुन दिवसभर फिरवून ते सायंकाळी मोशी परिसरात सोडून देत असत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two motorcycle thieves arrested