तरुणाला ढाब्याच्या पार्किंगमध्ये लुटले, मग पोलिसांनी आरोपींना असे शोधले

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 July 2020

नायगाव येथील बब्बी ढाब्याच्या पार्किंगमध्ये तरुणाला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी चोवीस तासात पकडले.

कामशेत (ता. मावळ) : नायगाव येथील बब्बी ढाब्याच्या पार्किंगमध्ये तरुणाला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी चोवीस तासात पकडले. शनिवारी (ता. ४) पावणे पाचच्या सुमारास गणेश महादेव सोनवणे याला बब्बी ढब्बाच्या पार्किंगमध्ये येत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लुटले होते. त्याच्याकडील सोन्याची अंगठी, रोख रक्कम, मोबाईल असा बावीस हजाराचा ऐवज ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड लुटून पोबारा केला. सोनवणे यांनी या बाबत पोलिसात तक्रार दाखल केली होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

आरोपींच्या शोधासाठी दोन पथक गेली. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी कासीम आबीद जाफरी (वय २२) व  वय १७ वर्षीय मुलाला शिवाजीनगर येथून ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पाटील, सहाय्यक पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे, संतोष घोलप, महेश दौंडकर, राम कानगुडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. चोरीला गेलेल्या मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two robbers were caught by the police within 24 hours in naigaon