esakal | दुचाकीस्वारच ठरताहेत रस्ते अपघातांत बळी; दरमहा एवढ्या जणांचा होतोय मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Black-Spot

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत रस्ते अपघातांत महिन्याला सरासरी २१ जणांचा अपघाती मृत्यू होत आहे. यात दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहे.

दुचाकीस्वारच ठरताहेत रस्ते अपघातांत बळी; दरमहा एवढ्या जणांचा होतोय मृत्यू

sakal_logo
By
मंगेश पांडे

पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत रस्ते अपघातांत महिन्याला सरासरी २१ जणांचा अपघाती मृत्यू होत आहे. यात दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहे. विरुद्ध दिशेने प्रवास, अतिवेग, चुकीचे गतिरोधक, मद्यपान करून वाहन चालविणे या कारणांमुळे अपघात झाल्याचे समोर येते. मागील दोन वर्षांत दर महिन्याला सरासरी २१ जणांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्यांवर जोरदार कारवाई सुरू केली आहे. यासह नेहमी अपघात घडत असलेल्या ठिकाणचा अभ्यास करून त्याठिकाणी उपाययोजना राबविण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी संबंधित विभागांशीही चर्चा झाली आहे. वाहतूक नियम पालनाबाबत व्यापक स्वरूपात जनजागृती केली जात आहे. 
- श्रीकांत डिसले, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अपघाताची कारणे 
ओव्हर स्पीड, अमानांकित गतिरोधक, मद्यपान करून वाहन चालविणे, विरुद्ध दिशेने विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट परिधान न करणे, खराब रस्ता, खड्डे, सूचना फलकांचा अभाव.

मूलभूत सुविधांचा अभाव
पथदिवे, सूचना फलकांचा अभाव, खराब रस्ते, अनेक ठिकाणी सुरू असलेली रस्त्यांची कामे

हेल्पलाईन
वाहतूक कक्ष - 9529681078
नियंत्रण कक्ष - 9529691966

Edited By - Prashant Patil