हिंजवडीत ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 November 2020

भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना हिंजवडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली आहे. 

पिंपरी : भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना हिंजवडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

संभाजी शिवाजी चव्हाण असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे चुलते प्रदीप विठ्ठल चव्हाण (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड, मूळ-रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार ट्रकचालक तात्या आजिनाथ भोरे (वय 34, रा. घोटावडे फाटा, पिरंगुट, ता. मुळशी) याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. शनिवारी (ता. 7) रात्री साडेअकराच्या सुमारास संभाजी चव्हाण हे हिंजवडीतील मेझा नाईन चौकातून दुचाकीवरून जात होते. 

खरेदीच्या बहाण्याने आली अन् सोन्याचे दागिने चोरून लंपास झाली

त्यावेळी वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करीत भरधाव आलेल्या भोरे या ट्रकचालकाने (एमएच. 12. एसएफ. 5972) चव्हाण यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two wheeler driver death in truck collision in hinjewadi