'मी इथला भाई आहे' म्हणत तरुणांना बेदम मारहाण; तळवडेतील प्रकार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 October 2020

दुचाकी आडवी लावून तरुणाला शिवीगाळ केली. 'तू मला ओळखत नाही का, मी इथला भाई आहे', अशी धमकी देत तरुणासह त्याच्या मित्राला दगडाने बेदम मारहाण केली.

पिंपरी : दुचाकी आडवी लावून तरुणाला शिवीगाळ केली. 'तू मला ओळखत नाही का, मी इथला भाई आहे', अशी धमकी देत तरुणासह त्याच्या मित्राला दगडाने बेदम मारहाण केली. हा प्रकार तळवडेतील रूपीनगर येथे घडला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आकाश ऊर्फ घोडा, अमर हिरनायक (वय 23, दोघेही रा. बौद्धनगर, ओटास्कीम, तळवडे), अरुण भातपुते (वय 23, रा. रूपी हौसिंग सोसायटी, रूपीनगर), यासह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी दीपक बाळू धोत्रे (वय 26, रा. राहुलनगर, ओटास्कीम, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी (ता. 25) रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी हे त्यांचे मित्र मनोज धोत्रे यांच्यासह रूपी हौसिंग सोसायटीतील रस्त्याने दुचाकीवरून जात होते. त्यावेळी दुचाकीवरून ट्रीपल सीट आलेल्या आरोपींनी त्यांची दुचाकी फिर्यादीच्या दुचाकीला आडवी लावली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माझ्या दुचाकीला तू आडवा का आला असे म्हणत आरोपी आकाश घोडा याने 'तू मला ओळखत नाही का, मी इथला भाई आहे' अशी फिर्यादीला धमकी दिली. फिर्यादीसह त्यांच्या मित्राला आरोपींनी शिवीगाळ, मारहाण करीत आरोपींपैकी एकाने फिर्यादीच्या तोंडावर फाईट मारली. दरम्यान, फिर्यादी व त्यांचे मित्र स्वत:ला वाचविण्यासाठी तेथून पळून जात असताना आरोपींनी रस्त्यावरील दगडे फिर्यादीसह त्यांच्या मित्राला फेकून मारली. तर आकाश घोडा याने हातात दगड घेऊन फिर्यादीच्या डोक्‍यात मारला. यामध्ये फिर्यादीसह त्यांचे मित्र गंभीर जखमी झाले. याप्रकरणी आरोपी आरोपी अमर व अरूण यांना अटक केली असून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two youth beaten in talwade

Tags
टॉपिकस