परदेशातून निगेटिव्ह आलेले ते दोघे मोशीत आल्यावर निघाले पॉझिटिव्ह

परदेशातून निगेटिव्ह आलेले ते दोघे मोशीत आल्यावर निघाले पॉझिटिव्ह

मोशी (पुणे) : येथील अजय व विजय (नावे बदललेली आहेत) हे दोन विद्यार्थी परदेशांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होते. शिक्षण घेत असलेल्या या परदेशी ठिकाणी काही व भारतामध्ये सापडलेले कोरोना रुग्ण यांची बातमी ऐकून त्यांनीही आपल्या मायदेशातील घरी परतण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना 'आम्ही 17 मार्च रोजी पहाटे घरी येत आहोत', असा निरोप कुटुंब प्रमुख आपले चुलते वीरेंद्र (नाव बदलले आहे) यांना दिली. हे दोन्ही विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत असल्यामुळे त्यांनी परदेशातून भारतात येताना आपापली कोरोना चाचणी करून घेतली. मात्र, त्यावेळी ती चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे समाधानी मनाने  त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार चुलते वीरेंद्र यांना 17 मार्चला आम्हाला न्यायला रात्री मुंबई विमानतळावर या असा निरोप दिला. 

त्यानुसार वीरेंद्र यांनीही आपल्याबरोबर एक मित्र आणि एक ड्रायव्हर घेऊन मोटारीने मुंबई येथील विमानतळावर त्यांना घेण्यासाठी रात्री पोहोचले. रात्री तीन ते चार तासांचा प्रवास करुन पहाटे चार वाजता हे सर्व मोशीतील आपल्या घरी पोहचले. घरी पोहोचल्यावर त्या दोघांनी चुलते वीरेंद्र व कुटुंबीयांना आम्ही पुन्हा एकदा कोरोना चाचणी करुन घेत असल्याचे सांगितले. घरच्यांनीही काळजी नको म्हणून त्यांना तत्काळ परवानगी दिल्याने ते दोघेही वायसीएम रुग्णालयात पोचले.0त्यांनी आम्ही आजच पहाटे परदेशातून आलेलो असल्याने आमची कोरोना चाचणी करावी, परदेशातून निघताना तेथून आम्ही कोरोना चाचणी करुनच आलो आहोत व ती निगेटिव्ह आल्याचे सांगितले. मात्र, इथे येऊन पुन्हा काही होऊ नये. तसेच, आमच्यामुळे कोणाला काही होऊ नये, अशी तेथील डाॅक्टरना कल्पना दिली. त्या दोन्ही धडधाकट तरुणांकडे पाहून व परदेशात केलेली चाचणी निगेटिव्ह आल्याचे ऐकून आजही तुमच्यात कोविडची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने तुम्ही घरी जा, असा सल्ला दिला. मात्र, तरीही या दोन्ही विद्यार्थ्यांनी आपणासह इतरांच्या हितासाठी आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने त्यापैकी एकाचा (अजयचा) स्वॅब घेऊन डाॅक्टरांनी त्यांना घरी पाठवले. 

अन् जेव्हा रिपोर्ट पाॅझिटीव्ह आला...

दोघांचे कुटुंबीय रिपोर्ट्स येईपर्यंत चिंतेत होते. पण हे दोघेही वैद्यकीय शिक्षण घेत असल्याने हे दोघेही बिनधास्त होते. दुसर्‍या दिवशी सकाळी अजयचा रिपोर्ट आला. अजयने दिलेल्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आणि याच रिपोर्टनुसार मोशीतील पहिला कोरोना रुग्ण अजय ठरला. हा रिपोर्ट पाहून अजयचा भाऊ विजय म्हणाला, अजयचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर माझाही रिपोर्ट नक्कीच पॉझिटिव्ह असेल. कारण, परदेशांमध्ये आम्ही दोघेही एकत्र राहणे, एकत्र महाविद्यालयात जाणे, अभ्यास करणे, फिरणे अशी सर्व कामे एकमेकांना सोडून कधीच केलेली नाहीत त्यामुळे मीही ही कोरोना चाचणी करून घेणारच. विजयचा हा निर्णय ऐकून चुलते वीरेंद्र व भाऊ विजय यांनी न घाबरता संपूर्ण कुटुंबासह मुंबईला बरोबर नेलेले मित्र व ड्रायव्हर यांचीही कोरोना चाचणी करून घेण्याचे ठरवत तत्काळ सर्वांचीच कोरोना चाचणी करून  घेतली. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विजयचाही रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला...

आलेल्या रिपोर्ट्सनुसार या सर्वांपैकी फक्त अजयचा भाऊ विजय याचीच कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. पॉझिटिव्ह ठरलेल्या अजय प्रमाणेच विजय यांनाही तत्काळ भोसरी येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. हे संपूर्ण कुटुंबही रिपोर्ट्स येईपर्यंत रुग्णालयातच होते. मात्र, उर्वरित सर्वांचेच रिपोर्ट्स निगेटिव्ह आल्याने त्यांना दुसर्‍या दिवशी पुढील 14 दिवसांसाठी घरीच क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देत घरी पाठविण्यात आले. 

अजय- विजय यांनी नावाप्रमाणेच मिळवला कोरोनावर विजय...

अजय आणि विजय यांच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले. दोघांनीही स्वतःहून कोरोना चाचणी करून घेण्याचे वेळेत दाखवलेले धाडस, पॅनिक न होता सकारात्मक विचारांनी उपचारांना दिलेली साथ, तत्काळ सुरु झालेले उपचार, डाॅक्टर्स, पारिचारीका व रुग्णालय प्रशासन यांनी केलेली सेवा यामुळे ते दोघे पाच ते सात दिवसांमध्ये कोरोना मुक्त झाले व चौदा दिवसांनी पुन्हा त्यांची केलेली कोरोणा चाचणी निगेटिव्ह आल्यावर घरी सोडण्यात आले.  

मित्र, शेजारी व नातेवाईक यांची झालेली मदत...

आपल्या कुटुंबातील सदस्यांना कोरोना झाला आहे, याचे वृत्त वाऱ्यासारखे मोशीमध्ये पसरले चुलते वीरेंद्र यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आमच्या कुटुंबातील दोन मुले कोरोना पॉझिटिव्ह आली म्हणून आम्ही क्षणभर गोंधळून व घाबरुन गेलो होतो. मात्र, कुटुंबातीलच एक असलेले जवळच राहत असलेले मित्र नगरसेवक वसंत बोराटे, नगरसेवक सागर हिंगणे, सामाजिक कार्यकर्ते संतोष बारणे  यांसह सर्व नातेवाईक, शेजारी मित्र यांनी आम्हाला तुम्ही कोणत्याही प्रकारे घाबरू नका. तुम्हाला हवी ती मदत आम्ही करू असे सांगून आम्हाला सर्वतोपरी मदत केली. पंधरा दिवस घरी असलेल्या काॅरंटाईन काळामध्ये आमच्या  कॉलनीमधील शेजारील कुटुंबीयांनी किराणा, दूध यांसारख्या गरजेच्या वस्तू आणून देणे, फोनवरुन हसत खेळत बोलत आमचे मनोबल वाढवणे यासारखी  सर्व मदत केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रुग्णालयातील मोफत उपचार व उत्तम सेवा...

भोसरी रुग्णालयातील  सेवेबद्दल अनुभवही खूप चांगला आहे. कोराना चाचणीसह सर्व उपचार, चहा, नाश्ता व जेवण हे सर्व मोफत मिळाले त्यामुळे आर्थिक अडचण भासली नाही. सर्व डॉक्टर्स आम्हाला वेळोवेळी  तपासणी करून उत्तम दर्जाचे उपचार करत होते. येथील पारिचारिका आमची घरच्या सारखी काळजी घेत होते.  वेळच्या वेळी औषध देणे, सुश्रुषा करणे, आमचे मनोबल वाढवणे यासारख्या सेवा त्यांनी दिल्याने आम्ही कधीच खचून गेलो नाही. तर उलट यामुळे आमच्यामध्ये कोरोना विरुद्ध लढण्याची ताकदच निर्माण झाली, असे अजय व विजय यांनी सांगितले. या कालावधीत मित्र, नातेवाईक व शेजारी यांनीही वेळोवेळी फोन करुन मनोबल वाढविले. 

अजय-विजयने केले प्लाझ्मा दान...

कोरोना झाल्याचे समजल्यावरही सकारात्मक विचार, उत्तम आहार, विहार व व्यायाम यामुळे आम्ही कोरोनावर मात केली. आमच्यामुळे कुटुंबासह अन्य कोणालाही कोरोना संसर्ग होऊ नये म्हणूनच आम्ही परदेशातून आल्यावर तत्काळ हा निर्णय घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्लाझ्मा दान करा, या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत व आमच्यामुळे जर कोणाचा कोरोना आजार बरा होत असेल तर आम्हीही प्लाझ्मा दान करण्याचीही तयारी दर्शवली आणि त्यानुसार आम्ही दोघांनीही प्लाझ्मा दान केले आहे.

कुटुंबासाठी दोन महिने राहिलो दुकानात...

वीरेंद्र यांनी सांगितले की, घरामध्ये मीच मोठा असल्याने व मीही या दोन मुलांना आणायला मुंबईला गेलो होतो म्हणून कदाचित या दोघांप्रमाणेच पुढील 14 दिवसांत मलाही कोरोनाचा संसर्ग झालाच, तर माझ्यामुळे कुटुंबातील इतर कोणालाही संसर्ग होऊ नये म्हणून मी सुमारे दोन महिने घरात न राहता दुकानातच राहिलो. शासनाने दुकाने खुली केल्यानंतरच दुकानात राहता येईना म्हणून मी सध्या घरी राहत आहे. मात्र अजय व विजयसह आम्ही घरातील सर्वच जण डाॅक्टरांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घेत आहोत.

आमच्यासारखा अनुभव घ्यायचा नसेल, तर काय काळजी घ्याल...

कोरोना पाॅझिटिव्ह आल्यावर पहिले काही दिवस आमच्या मनाची व कुटुंबाची काय अवस्था झाली. ही आमची आम्हालाच माहित आहे. जगातील कोणावरही ही वेळ येऊ नये, अशीच आम्ही मनोकामना करत आहोत. परंतु, आम्ही घेत असलेली काळजी, मित्रांसह नातेवाईक व शेजार यांनी केलेल्या मदतीमुळे आम्ही आता निर्धास्त आहोत. कोणत्याही कारणास्तव आम्ही कोणीही घराबाहेर पडत नाही. घरामध्ये सुद्धा आम्ही सर्वजण मास्क वापरत असून सोशल डिस्टन्सचे पालन करत आहोत. घर, घरातील सर्व वस्तू यांची दिवसातून दोन वेळा सॅनेटायझर, हायपोक्लोराईड व डिटर्जंट पावडरच्या पाण्याने स्वच्छता करत आहोत. वेळोवेळी हात धुणे, एकमेकांच्या वस्तू न वापरणे, मास्क वेळोवेळी धुवून स्वच्छ करणे याबाबी कटाक्षाने करत आहोत. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उकळलेले पाणी भरपूर पिणे, योग्य आहार घेतो व योग्य व्यायामही करीत आहोत. अधूनमधून स्थानिक डाॅक्टरांकडून आरोग्य तपासणी करुन घेत आहोत. अशाप्रकारे सर्व कुटुबीय काळजी घेत असल्याने सध्या आम्ही उत्तम आहोत. 

मोशीकरांसह इतरांनीही घ्यावी प्रेरणा...

खरोखरच मोशीमध्ये वाढणारी रुग्ण संख्या लक्षात घेता कोरोना संसर्गापासून दूर राहायचे असेल, त्यानंतरच्या परिणामांना, अडचणींना सामोरे जायचे नसेल; तर या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या या दोन्ही युवक व त्यांचे कुटुंबीयांकडून अन्य नागरिकांनी प्रेरणा घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com