मावळातील तरुणांनी बेरोजगारीवर शोधला नवा पर्याय; ग्रामीण भागात व्यवसायाला पसंती

रामदास वाडेकर
Monday, 5 October 2020

  • चहा व्यवसायाने दिला बेरोजगारांना आधार
  • मावळ तालुक्‍यातील प्रमुख शहरांसह ग्रामीण भागात अनेकांनी थाटला व्यवसाय

कामशेत (ता. मावळ) : कोरोनाने गेल्या सहा महिन्यांपासून अनेकांच्या अनेक सवयी बदलण्यास भाग पाडले. निर्बंध उठल्यानंतरही डोक्‍याला ताप नको म्हणून अजूनही बहुतांश जण बाहेर खाणे टाळतात. पण या सर्वांना अपवाद ठरला तो गरमागरम चहा. बाहेर पडल्यावर अनेकांनी चहा, काढा, हळदीचे दूध, मसाला दुधाला आपलेसे केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हॉटेल, ढाबे बंद असल्याने घराबाहेर पडल्यावर पोटात काय टाकायचे याची गैरसोय होत असायची. बसायचे कुठे हाही प्रश्‍न. या प्रश्नावर चहाचे दुकान हा तोडगा निघाला. चहाचे दुकान बसण्याचे आणि पोटात गरमागरम दोन घोट टाकण्याचे हक्काचे ठिकाण झाले. या ठिय्यावर बसून सुखदु:खाच्या चर्चा गुजगोष्टी रंगू लागल्या. कोरोनाची भीती, चिंतेने काळजी वाढू लागली. कोरोनावर अनेकांनी मात केली, या आशादायक बाबींचा ऊहापोह येथेच रंगतोय. कोणाच्या सोयरिकीची, कोणाच्या गाई-म्हशी आणि जमिनीच्या व्यवहाराची गोष्ट येथेच निघाली.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कित्येक वर्षांनी भेटलेल्या मित्राला येथेच फक्कड चहा पाजला. लॉकडाउन उठल्याने चहाच्या दुकाने वाढली आहे. हातचे काम गेलेल्या कित्येकांनी चहाची दुकाने थाटली आहे. कामशेत, वडगाव, तळेगाव, लोणावळा, पवनानगर, सोमाटणे, इंदोरी, टाकवे बुद्रूक, कार्ला, नवलाख उंब्रेत हे प्रमाण अधिक आहे. सुरक्षेच्या दृष्टीने येथे सोशल डिस्टन्सिंग पाळून चहा विक्री होताना आपण पाहतो. सत्यवान खोल्लम म्हणाले, ‘‘वेहेरगावला वायरमनचे कामात होतो. काम गेल्यावर एकवीरा देवीच्या गडाच्या पायथ्याला दुकान सुरू केले. मंदिर बंद असल्याने दुकान बंद झाले. दोन महिने झाले. उड्डाणपुलाच्या शेजारी चहाचे दुकान सुरू केले. मुलगा अभिजित मदत करतो.’’

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अमोल गायकवाड म्हणत होता, ‘‘वडगावला कामाला होतो. बारा हजार पगार होता. मे पर्यत पगार मिळाला. जूनपासून उत्पन्न बंद झाले. दोन महिन्यांपासून भाड्याने दुकान घेऊन चहाचा धंदा सुरू केला.’’ फळे विक्रेते रामदास शिंदे यांचे फळांचे दुकान आहे. त्याच्यात चहा बनवून विकतो. दुकानाचे भाडे विजेचे बिल घर खर्च आहे.’’

बुधवडीचा शेखर बोडके सांगत होता, घरचे दहा लिटर दूध आहे. गणपती चौकात हातगाडीवर चहा करून बाजारपेठेतील किराणा, कापड दुकानात फिरून चहा विकतो.’’  ओझर्डेचा अनिल ओझरकर म्हणाले, ‘‘मी वडगावला कामाला होतो. कोरोनात काम गेले. महामार्गावर पहाटे चारला गाडी लावतो. रात्री बंद करतो. मार्चमध्ये आईचे निधन झाले. वडिलांचे ऑपरेशन झाले. आईचे निधन झाले. वडिलांच्या औषधोपचारासाठी आर्थिक विवेचनात आहे. सरकारने मदत करावी.’’ 

तालुक्‍याच्या गावात शासकीय कामानिमित्त व बाजारहाट घेण्यासाठी येत असतो. येथे आल्यावर मित्रमंडळींसमवेत चहाचे दोन घोट घेत असतो. येथे येऊन चहा न पिता गेलो, तर काहीतरी विसरल्यासारखे होते
- स्वामी शेटे, शेटेवाडी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unemployed started tea business in maval taluka