
पिंपरी : चिंचवड येथील दीड वर्षांपूर्वीच्या खुनाचा उलगडा करण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला यश आले आहे. घरगुती जमिनीच्या वादातून पुतण्यानेच चुलत्याचा खून केल्याचे समोर आले असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे. राकेशकुमार वीरेंद्रप्रसाद (वय ३५, रा. लांडगेनगर, भोसरी, मूळ- सिरसा, हरियाणा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सुबोधकुमार अकिंदर प्रसाद कुशवाह (वय २०) या आरोपीला अटक केली असून रत्नेश समाकान्त रॉय याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
चिंचवड , वाल्हेकरवाडी येथे १२ फेब्रुवारी २०२१ ला खून झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळला होता. मृताची ओळख पटत नव्हती. दरम्यान, गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने भोसरी एमआयडीसी व चिखली परिसरातील सुमारे तीनशे कंपन्या तपासल्या. दरम्यान, त्यांना भोसरीतील सेक्टर क्रमांक सात येथील दलने इंडस्ट्रीज प्रा. ली. येथील एक कामगार दीड वर्षपासून गैरहजर असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या कंपनीचे मालक स्वप्नील दलने यान एमआयडीसी व चिंचवड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या घटनेतील मृताचे फोटो दाखविले असता त्यांनी राकेशकुमार याना ओळखले.
त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक दृष्टीने तपास केला असता दोघे अरोपी निष्पन्न झाले. त्यानंतर बिहार येथे सात दिवस वेषांतर करून राहून कुशवाह याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता जमिनीच्या वादातून रॉय याच्या मदतीने खून केल्याची कबुली त्याने दिली. पोलिस अधिक तपास करीत आहेत. ही कारवाई युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, सहायक निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, अंमलदार फारुख मुल्ला, सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, अमित खानविलकर, सचिन मोरे, मनोजकुमार कमले, गणेश महाडिक, बाळू कोकाटे, प्रमोद गर्जे, मारुती जयभाय, प्रमोद हिरळकर यांच्या पथकाने केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.