
तळेगाव दाभाडे : वडगाव फाटा हे मावळ तालुक्यातील एक महत्त्वाचे वाहतूक केंद्र आहे. या ठिकाणी दररोज सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. तळेगाव-चाकण फाट्यावर दररोज होणाऱ्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, आता या फाट्यावरदेखील वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.