पिंपरीतील सोसायटीत टोळक्याचा धिंगाणा; काचा फोडून सीसीटीव्ही, वाहनांची तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 March 2021

  • टोळक्यावर गुन्हा दाखल

पिंपरी : पाच जणांच्या टोळक्याने एकाला रस्त्यात अडवून मारहाण करीत रोकड लुटली. तसेच, सोसायटीच्या काचा फोडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह चार वाहनांची तोडफोड करीत परिसरात दहशत निर्माण केल्याची घटना पिंपरीतील यशवंतनगर येथे घडली. रोहित मुकिदा पवार (वय १९), अविनाश नागनाथ माने (वय २०, दोघेही रा. टेलको रोड, भोसरी) यांना अटक केली असून, शंकर ऊर्फ गट्या चौधरी (वय २०, रा. यशवंतनगर, पिंपरी), बाळ्या व अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी रामशंकर उदयराज गुप्ता (रा. शिवसाई पार्क सोसायटी, यशवन्तनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फिर्यादी हे त्यांचे ऑफिस बंद करून घरी जात असताना, सोसायटीच्या पार्किंगमध्ये आरोपींनी त्यांना अडवून मारहाण केली. त्यांच्याकडील आठ हजारांची रोकड काढून घेत सोसायटीच्या काचा व सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. तसेच, फिर्यादीच्या मोटारीची तोडफोड केली. त्यानंतर आरोपी हे फिर्यादीच्या ऑफिसच्या ठिकाणी गेले. तेथे ऑफिससमोर उभ्या असलेल्या तीन ट्रकवर दगडफेक करून तोडफोड करीत परिसरात दहशत निर्माण केली. या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vandalism by a mob in society at pimpri yashvant nagar