सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी वंचितचे डफली बजाओ आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 August 2020

सध्या 80 टक्‍क्‍यांहून अधिक गोरगरिब उपासमारीचा सामना करीत आहेत. याकरिता रोजगार सुरु होऊन उद्योग व्यवसायांची घडी बसणे गरजेचे आहे.

पिंपरी, ता. 12 : लॉकडाउनमध्ये स्थगित केलेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे रोजगार कोलमडला आहे. उद्योगधंदे अद्यापपर्यंत सुरळीत झालेले नाहीत. त्याकरिता वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आली. झेंडे व डफली वाजवून 'डफली बजाओ' आंदोलन वल्लभनगर एसटी आगार बुधवारी करण्यात आले.

कोरोना विरूद्ध लढण्यासाठी 80 टक्के नागरिकांची प्रतिकारक्षमता चांगली आहे. वैद्यकीय उपचार घेऊन 15 टक्के नागरीक बरे झाले आहेत. केवळ 5 टक्के नागरीक बरे होत नाहीत. त्याकरिता शंभर टक्के नागरिकांवर निर्बंध लादणे चुकीचे आहे. सध्या 80 टक्‍क्‍यांहून अधिक गोरगरिब उपासमारीचा सामना करीत आहेत. याकरिता रोजगार सुरु होऊन उद्योग व्यवसायांची घडी बसणे गरजेचे आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यात गणपती उत्सवासाठी बुकींग सुरु झाले आहे. मात्र, जिल्हयातील बंदी उठवली नाही. लॉकडाउनचे निर्बंध पूर्णपणे वगळायला हवेत. सोशल डिस्टन्सचे नियम व आरोग्याच्या नियमांचे पालन करुन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत होणे आवश्‍यक आहे. रेल्वे वाहतूकीचाही तितक्‍याच गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. अशी मागणी निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडी पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष देवेंद्र तायडे, महासचिव अनिल जाधव, युवक अध्यक्ष गुलाब पानपाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यवस्थापक पीएमपी, व्यवस्थापक वल्लभनगर डेपो यांच्याद्वारे केली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: VBA agitation for public transportation