esakal | पिंपरी पोलिस ठाण्याच्या आवारात भडकली आग
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी पोलिस ठाण्याच्या आवारात भडकली आग
  • अनेक वाहने जळाली आहेत. 

पिंपरी पोलिस ठाण्याच्या आवारात भडकली आग

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी पोलिस ठाण्याच्या आवारातील वाहनांना आग लागल्याची घटना सोमवारी (ता. 9) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. यामध्ये अनेक वाहने जळाली आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

चिंचवड स्टेशन येथे जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगतच पिंपरी पोलिस ठाणे आहे. येथे विविध गुन्ह्यात जप्त केलेली वाहने पोलिस ठाण्यालगतच असलेल्या मोकळ्या जागेत उभी केलेली आहेत. यामध्ये दुचाकींसह चारचाकी वाहनांचाही समावेश आहे. सोमवारी दुपारी अचानक या वाहनांना आग लागली. महामार्ग जवळच असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते. दरम्यान, अचानक लागलेल्या आगीमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. बघ्यांनी गर्दी केल्याने या रस्त्यावर वाहतूकोंडीही झाली होती. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत अग्निशामक दलाला कळविल्याने ते घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पिंपरीसह इतरही पोलिस ठाण्यांमध्ये गुन्ह्यातील अनेक वाहने वर्षोनुवर्षे उभी केलेली असतात. काही वाहने तर त्याच जागेवर अक्षरश: खराब होऊन जातात. तरीही संबंधित वाहनाबाबतचा निर्णय होत नाही. या वाहनांमुळे जागाही अपुरी पडते.