मोशीतील आरटीओ कार्यालयात वाहनांना आग 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 February 2021

मोशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात उभ्या असलेल्या पाच ते सहा वाहनांना अचानक आग लागली.

पिंपरी : मोशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात उभ्या असलेल्या पाच ते सहा वाहनांना अचानक आग लागली. ही घटना शुक्रवारी (ता. 5) सायंकाळी घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आरटीओने कारवाई केलेली अनेक वाहने याठिकाणी उभी केलेली आहेत. काही वाहने तर अनेक महिन्यांपासून येथेच पडून आहेत. यामध्ये छोट्या-मोठ्या वाहनांसह खासगी बसचाही समावेश आहे. शुक्रवारी सायंकाळी यातील काही वाहनांना अचानक आग लागली. याबाबत अग्निशामक दलाला माहिती मिळताच दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. दूरपर्यंत धूर पसरला असल्याने अनेक नागरिक घटनास्थळी धाव घेत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह त्याठिकाणी आलेल्या नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. पाच मोठ्या वाहनांना आग लागल्याचे समजत आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट झालेले नाही. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vehicles fire at rto office in moshi pimpri chinchwad

Tags
टॉपिकस
Topic Tags: