थेरगावात आढळला चित्रबलाक पक्षी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

very large rare Painted stork bird was found in Thergaon wakad pune

थेरगावात आढळला चित्रबलाक पक्षी

वाकड : थेरगाव येथील नवीन थेरगाव हॉस्पिटल समोर एका आडोश्याला दोन दिवसांपासून स्तब्ध थांबलेल्या दुर्मिळ जातिच्या भल्या मोठ्या चित्र बलाक पक्षाला पशु मित्रांनी ताब्यात घेतले. शुक्रवारी (ता. १५) या पाहुण्याला सुखरुप कात्रजच्या वन्य पशुपक्ष्यांच्या अनाथालयात जमा करण्यात आले. गुरुवारी (ता. १४) दुपारी एका व्यक्तिचा सर्परक्षक व पशुमित्र गणेश भुतकर यांना फोन आला. तो व्यक्ती म्हणाला, आमच्या इथे खुप मोठा पक्षी दोन दिवसांपासुन उभा आहे कदाचित तो जखमी असावा त्यामुळे त्याला उडता येत नसेल तुम्ही काही मदत करू शकता का? माहिती मिळताच भूतकर यांनी वाईल्ड अनिमल अँड स्नेक प्रोटेक्शन सोसायटी या संस्थेचे स्वयंसेवक प्रसाद नखाते यांना घटनास्थळी पाठवले. प्रसाद यांनी दोन मित्रांसह तो पक्षी सुखरूप पकडुन घरी आणला.

त्याच्या शरीरावर कुठे काही जखम आहे का याची पाहणी केली मात्र त्याला कुठे काही इजा नव्हती मात्र, शरीरात आतून जखम झाली असावी त्यामुळे त्याचे निदान होऊन त्याला कात्रज संग्रहालयात उपचार मिळतील या उद्देशाने त्याला कात्रज प्राणी संग्रहालयात सोडण्याचे ठरले. तो पक्षी चित्रबलाक (पेंटेड स्ट्रॉर्क) जातीचा दुर्मिळ पक्षी होता. सुमारे तीन किलो वजनाचा चित्रबलाक उभा असता त्याची उंची ९५-१०० सें.मी (सुमारे तीन फूट) भरते तर उडतांना पंखांच्या बाजूने लांबी १५०-१६० सें.मी भरते. पूर्ण यौवन अवस्थेत असलेला हा पक्षी रंगाने करडा लांब चोच असलेला आणि साधारण दोन वर्षे वयाचा असावा.

जुलै, ऑगस्ट हा त्यांचा विणेचा हंगाम असून या काळात ते सरोवर व गाळाच्या ठिकाणी आढळतात मासे, साप व अन्य छोटे जलचर प्राणी त्यांचे भक्ष्य आहे अशी माहिती प्राणी मित्र हभप शेखर जांभूळकर यांनी सकाळशी बोलताना सांगितली. तरी नागरीकांना कुठेही जखमी वन्यजीव (प्राणी, पक्षी, साप ई.) आढळल्यास वाईल्ड अँनिमल्स अँण्ड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीच्या ला संपर्क साधावा.

पुणे विभाग - आनंद अडसुळ सर ( ९८६०१८१५३४)

पिंपरी चिंचवड विभाग :- गणेश भुतकर (९९७०६६८८८६) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: Very Large Rare Painted Stork Bird Was Found In Thergaon Wakad Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top