

पिंपरी : गावगुंडांचा हैदोस आणि सर्वसामान्यांना त्रास देणं यासारखे प्रकार आपल्या आजुबाजूला सर्रास घडत असतात. पिंपरी-चिंचवड भागातील पिंपळे गुरव इथंही असाच एक प्रकार समोर आला आहे. एका गावगुंडानं टपरीवाल्याला शिवीगाळ करत हप्ता वसूल केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला शोधून काढत खाकीचा चांगलाच दणका दाखवला. त्यानंतर वठणीवर आल्यानंतर त्यानं कॅमेऱ्यासमोर जाहीर माफी मागितली.