पिंपरी-चिंचवडकरांसाठी अभिमानाची बाब:अवघ्या 21व्या वर्षी विश्‍वेश झाला 'लेफ्टनंट' 

Vishwvesh Chavanke
Vishwvesh Chavanke

पिंपरी - लॉकडाउनचा काळ बऱ्याच जणांना कंटाळवाणा व असह्य गेला. मात्र, जिद्द व चिकाटीने झपाटलेल्यांना नक्कीच तो साखरेहून गोड ठरला. कोणत्याही क्‍लासविना प्रचंड अभ्यास व मेहनतीच्या जोरावर रहाटणीतील विश्‍वेश चवाणके याने इंडिअन आर्मी एसएससीटेकची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. अवघ्या एकविसाव्या वर्षी भारतीय लष्कराच्या सेवादलात लेफ्टनंटपदी तो रूजू झाला आहे. पिंपरी-चिंचवडकरांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. 

रहाटणी राजगड कॉलनी, फुंगणालय कॉलनी येथे राहणारे चवाणके हे मध्यमवर्गीय कुटुंब. विश्‍वेशने चौथीपर्यंतचे शिक्षण चिंचवडमधील बांठिया प्राथमिक शाळेत घेतले. त्यानंतर दहावीच्या पुढचे शिक्षण फत्तेचंद जैन विद्यालयात घेतले. तेथून पुढे पुणे विद्यार्थीगृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्‍नॉलॉजी येथे संगणक अभियंता पदवी घेतली. शिक्षण सुरु असतानाच त्याने परीक्षेची तयारी सुरु ठेवली. ऑनलाइनच परीक्षेची माहिती घेऊन अभ्यासास सुरुवात केली. जनरल नॉलेज, सायकॉलॉजी अशा विविध विषयांची घरीच तयारी केली. ग्रुप चर्चा सर्वांशी बोलून तो करत असे. विश्‍वेशचे दोन्ही मावस भाऊ अतुल नलगे व विवेक नलगे हे आर्मी व एअर फोर्समध्ये असल्याने त्यांचा आदर्श व मार्गदर्शनही होते. विश्‍वेशने दहावीनंतरच भारतीय सेवा दलात जाण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि ते पूर्णही केले. गिटार, क्रिकेट, फुटबॉलसह विश्‍वेश भाषणातही पारंगत आहे. 

सदाशिव पेठेत खळबळ; बांधकाम सुरू असलेल्या बिल्डींगमध्ये सापडला महिलेचा मृतदेह​

सध्या मी चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग ऍकॅडमी येथे 49 आठवड्यांचे प्रशिक्षण घेत आहे. पाच दिवसांच्या मुलाखतीनंतर माझी निवड झाली. आनंद झाला आहे. आयआयटीसाठी ही मी लॉकडाउनमध्ये प्रयत्न केला होता. महाराष्ट्रात ऑल इंडिया रॅंकमध्ये दोनशे जणांमधून मी पाचवा आलो आहे. यातही तितकेच मला समाधान आहे. 
- विश्‍वेश चवाणके, लेफ्टनंट 

लहानपणापासूनच अभ्यासात हुशार आहे. लॉकडाउन कालावधीत तो विविध विषयांवर सर्वांशी चर्चा करत असत. संगणक अभियंता होऊन अमेरिका आणि जर्मनीला जाण्यापेक्षा निश्‍चितच देशसेवा करण्यात अभिमान आहे. आपला मुलगा देशसेवेसाठी जातोय याचा गौरव आहे. 
- अविनाश चवाणके, वडील, रहाटणी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com