Chinchwad By Election : आजारी पेशंटने तात्पुरता डिस्चार्ज घेऊन बजावला मतदानाचा हक्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chinchwad By Election : आजारी पेशंटने तात्पुरता डिस्चार्ज घेऊन बजावला मतदानाचा हक्क

Chinchwad By Election : आजारी पेशंटने तात्पुरता डिस्चार्ज घेऊन बजावला मतदानाचा हक्क

जुनी सांगवी : सकाळी कमी प्रतिसाद राहिलेल्या जुनी सांगवी परिसरात दुपारनंतर मतदारांनी बाहेर पडत मतदान केंद्रावर येवून मतदानाचा हक्क बजावला. जुनी सांगवी येथील पाच केंद्रावर सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू होती. जुनी सांगवी येथील प्रेम कांबळे या नवरदेवाने स्वतःच्या लग्नाला थोडा विलंब करून आधी मतदान करून लोकशाही कर्तव्य पार पाडले. त्यानंतर आजारी असतानाही दवाखान्यात ऍडमिट असतानासुद्धा भारतीय संविधानाने दिलेल्या मतदानाचा अधिकार बजावून लोकशाही कर्तव्याचे पालन केले. जुनी सांगवी येथील अमित बाराथे, त्रिशाला खरात यांनी डॉक्टरांकडून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन मतदानाचा हक्क बजावला त्यांना ने आण करण्याची जबाबदारी सामाजिक कार्यकर्ते वसंत कांबळे यांनी पार पाडली. येथील कै.सौ.शकुंतला शितोळे शाळेत उन्हाचा चटका सहन करत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.येथील मनपा शाळा, नॅशनल स्कूल,वगळता इतर केंद्रावर अपुरी सावली व्यवस्था व पार्कींगच्या अडथळ्यांची शर्यत मतदारांना पार करावी लागली.काही शाळांमधून निवडणूक विभागाकडून सेल्फी पाँइंट ठेवले नसल्याने सेल्फी प्रेमींचा हिरमोड झाला.पिंपळे निलख भागातही विविध पक्षांकडून यादी नाव व पावती साठी उभारलेले मंडप अपुरे पडले. काही जणांची राहात्या ठिकाणांऐवेजी वेगळ्या ठिकाणी मतदार यादीत नाव आल्याने फरपट करावी लागली. नागरिकांनी मतदान केंद्राच्या शंभर मिटर बाहेर दुतर्फा पार्कींग केल्याने मोठ्या वाहनांमुळे अनेकदा नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागला.पिंपळे निलख येथे मतदान सुरळीत सुरू होते.

फोटो ओळ-जुनी सांगवी येथे आजारपणामुळे दवाखान्यात उपचारार्थ भरती असतानाही येथील अमित बाराथे,त्रिशाला खरात यांनी डॉक्टरांकडून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन मतदानाचा हक्क बजावला.

फोटो -१) अमित बाराथे,२) त्रिशाला खरात