'सकाळ'च्या बातमीनंतर माहापालिकेने धोकादायक झाडे हटविली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जुलै 2020

शहरातील उड्‌डाणपूलावर वाढलेली वड, पिंपळाची झाडे काढण्याची मोहिम उद्यान विभागाने सुरू केली आहे.

पिंपरी  : शहरातील उड्‌डाणपूलावर वाढलेली वड, पिंपळाची झाडे काढण्याची मोहिम उद्यान विभागाने सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात उड्‌डाणपूलावर झाडे वाढली, हे वृत्त दैनिक सकाळमध्ये प्रसिध्द झाले होते. त्यानंतर खडबडून जाग आलेल्या महापालिका प्रशासनाकडून तातडीने हे काम हाती घेण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

निगडी परिसरातील मधुकर पवळे उड्‌डाणपूलाच्या दोन्ही बाजूला वड, पिंपळाची झाडे वाढण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान, उद्यान विभागाने याठिकाणची झाडे काढली आहेत. दरवर्षी, या पूलावर झाडे वाढतात आणि महापालिकेकडून ती काढण्यात येतात. झाडांची वाढ होत असणाऱ्या अशा जागांवर केमिकल प्रक्रिया करण्याची आवश्‍यकता आहे, त्यानंतरच हा प्रश्‍न कायमस्वरुपी सुटणार आहे. 

हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस सुरु होण्यासाठी पुणेकरांना आणखी वाट पाहावी लागणार, कारण...

भोसरीमधील राजमाता जिजाउ उड्‌डाणपूलावर वाढलेली झाडे काढण्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. यावर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे पूलावरील झाडे काढण्याचे काम पूर्ण करण्यास पालिका प्रशासनाला उशीर झाला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पावसाला सुरुवात झाली असली तरी त्याने अद्याप जोर धरलेला नाही, त्यामुळे जुन्या पुणे-ंबई महामार्गावरील ग्रेडसेपरेटर आणि अन्य भागात वाढलेली झाडे काढण्याचे काम लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे उद्यान अधीक्षक दत्तात्रय गायकवाड यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wad, Pimpal tree removal campaign started