rmc plant
sakal
पिंपरी - ताथवडे, पुनावळे, वाकड आणि रावेत परिसरात लोकवस्तीच्या मध्यभागी सुरू असलेल्या रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लांटमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या प्लांटमधून सातत्याने उडणारी धूळ, सिमेंटचे सूक्ष्म कण आणि वाहनांची वर्दळ यामुळे संपूर्ण परिसरात प्रदूषणात मोठी भर पडत आहे. परिणामी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि श्वसनविकार असलेल्या रुग्णांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.