Wakad Bus Accident : वाकडमध्ये पुन्हा मद्यधुंद बसचालकाचा कहर; विरुद्ध दिशेने येत मोटार व रिक्षेला जोरदार धडक; मोटारचालक जखमी; बसचालकावर गुन्हा दाखल!

Wakad Drunk Driver Bus Accident : वाकडमध्ये पुन्हा एकदा मद्यधुंद खाजगी बसचालकाने विरुद्ध दिशेने येत मोटार व रिक्षाला जोरदार धडक दिली. अपघातात मोटारचालक जखमी झाला असून बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Drunk Bus Driver Creates Chaos Again in Wakad Area

Drunk Bus Driver Creates Chaos Again in Wakad Area

Sakal

Updated on

बेलाजी पात्रे

वाकड : आरएमसी मिक्सर आणि अन्य बांधकाम साहित्य वाहणाऱ्या अवजड वाहनांपाठोपाठ खाजगी बस चालकांचा मुजोरपणा समोर येत आहे. हिंजवडीतील मद्यधुंद बसचालकाने तिघा सख्ख्या भावंडांचा जीव घेतल्याच्या घटनेला दोन दिवस उलटत नाहीत तोच याच भागात पुन्हा एका मद्यधुंद खाजगी बस चालकाने विरुद्ध दिशेने भरधाव येत मोटार आणि रिक्षाला जोरदार धडक दिली. बुधवारी (ता. ३) मध्यरात्री झालेल्या या अपघातात मोटारचालक जखमी झाला असून दोन्ही वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com