

Vehicles parked illegally on footpaths and road edges in Wakad–Hinjewadi
वाकड : ‘आयटी हब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी आणि वाकड परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बेकायदा पार्किंगचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रस्ते अरुंद होऊन वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना, पदपथांवर, अगदी नो-पार्किंग झोनमध्येही दुचाकी-चारचाकी वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ९ या गर्दीच्या वेळेत सर्वांचाच खोळंबा होत आहे.