esakal | पोलिसांचा फौजफाटा अन् गुंडांची टोळी पाहून नागरिकही चक्रावले
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांचा फौजफाटा अन् गुंडांची टोळी पाहून नागरिकही चक्रावले

प्राणघातक हल्ला, दगडफेक करीत टोळक्‍याने शुक्रवारी (ता. 30) रहाटणी येथे दहशत माजविली. ज्या ठिकाणी या टोळक्‍याने दहशत माजविली त्या परिसरात वाकड पोलिसांनी या टोळक्‍यातील गुंडांना सोमवारी (ता. 2) पायी फिरवलं.

पोलिसांचा फौजफाटा अन् गुंडांची टोळी पाहून नागरिकही चक्रावले

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : प्राणघातक हल्ला, दगडफेक करीत टोळक्‍याने शुक्रवारी (ता. 30) रहाटणी येथे दहशत माजविली. ज्या ठिकाणी या टोळक्‍याने दहशत माजविली त्या परिसरात वाकड पोलिसांनी या टोळक्‍यातील गुंडांना सोमवारी (ता. 2) पायी फिरवलं. तपासासाठी या गुंडांना घटनास्थळी आणल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिसांचा फौजफाटा व त्यामध्ये गुंडांचे टोळके असल्याने नागरिकही हे नेमके काय सुरू आहे हे पाहत होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शुभम निवृत्ती कवटेकर (वय 23), दीपक नाथा मिसाळ (वय 23), मंगेश मोतीराम सपकाळ (वय 23, दोघेही रा. काळेवाडी), कैलास हरिभाऊ वंजारी (वय 19), आकाश महादेव कांबळे (वय 22), सनी गौमत गवारे (वय 19, तिघेही रा. रहाटणी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच, इतर दोन अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आरोपींना न्यायलयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली होती. 

पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर पदासाठी भाजपचा उमेदवार ठरला

ही कोठडी सोमवारी संपल्याने तपासाकरिता वाकड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने या आरोपींना ज्या ठिकाणी तोडफोड केली होती, त्या ठिकाणी नेले. हत्यारे ताब्यात घेण्यासह घटना नेमकी कशी घडली, किती ठिकाणी तोडफोड केली, कोणत्या दिशेने आले, आदींची माहिती आरोपींकडून घेण्यात आली. 
दरम्यान, चार दिवसांपूर्वीच परिसरात धूडगूस घालणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याचे पाहून स्थानिकांनीही सुस्कारा सोडला.