
वाकड : खान्देशची कन्या दिव्या सूर्यवंशीला न्याय मिळावा व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी शहरातील खान्देश बांधवांनी रविवारी (ता. २४) मूक मोर्चा काढला. या घटनेचा निषेध करत विशेष तपास पथक स्थापन करावे, विशेष सरकारी वकील नेमावेत, खटला जलदगती न्यायालयात चालवावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.