
वाकड / हिंजवडी : लाँग विकेंड आणि रक्षाबंधनाचा सण यामुळे बहिणीकडे तसेच मूळगावी जाणाऱ्या वाहनांची संख्या अचानक वाढल्याने शनिवारी (ता. ९) वाकड, हिंजवडी, ताथवडे आणि पुनावळे परिसरातून शहराबाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर तसेच मुंबई-बंगळूरू महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला.