
वाकड : वाकड, हिंजवडीत वाहतुकीच्या कोंडीत भर घालणाऱ्या मोक्याच्या वर्दळीच्या चौकातील अवैध आणि बेशिस्त पार्किंगकडे पोलिसांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. दुसरीकडे जिथे फारशी गरज नसताना वाहतूक पोलिसांकडून दुचाकी, चारचाकी वाहनांवर टोईंगची मनमानी कारवाई केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहेत.