Wrestling Competition : ६५ वर्षीय मल्लाची कामगिरी, वाखरीत वारकऱ्यांनी गाजवला कुस्तीचा आखाडा

सलग चौदाव्या वर्षी श्री क्षेत्र पंढरपुरातील वाखरी, येथे ज्येष्ठ वारकऱ्यांचा कुस्तीचा आखाडा रंगला.
shantaram jadhav
shantaram jadhavsakal

- बेलाजी पात्रे

हिंजवडी - सलग चौदाव्या वर्षी श्री क्षेत्र पंढरपुरातील वाखरी, येथे ज्येष्ठ वारकऱ्यांचा कुस्तीचा आखाडा रंगला. तमाम वैष्णव जणांना भक्ती आणि शक्तीचा अपूर्व संगम त्यानिमित्ताने अनुभवता आला. मात्र, हा आखाडा व वाखरीचे मैदान मुळशी तालुका पायी दींडी सोहळयातील वारकरी, आयटी नगरीचे रहिवाशी ह.भ.प. शांताराम रामभाऊ जाधव या ६५ वर्षीय ज्येष्ठ वारकरी मल्लाने खऱ्या अर्थाने गाजविले.

हभप. शांताराम जाधव यांनी सलग तीन कुस्त्या जिंकत उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली. बीडच्या नलावडे वारकरी मल्लासोबत झालेल्या अटीतटीच्या सामन्यात त्यांचा पराभव झाला. श्री समर्थ विष्णुदास वारकरी महावीर कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कुस्त्या केल्याबद्दल समस्त नेरे ग्रामस्थ व सैनिक युवा फोर्स यांच्या वतीने जाधव यांचा एनआयएस कोच दादुजी कोंडदेव पुरस्कार विजेते विलास कथुरे, मुळशी तालुका वारकरी दींडी सोहळा दिंडीचे चालक ह.भ.प. तात्या महाराज बोरकर यांच्या हस्ते त्यांचा जाहिर सन्मान करण्यात आला.

यावेळी भारत केसरी विजय गावडे, काँग्रेसचे नेते पै.चंद्रकांत सातकर, महाराष्ट्र चॅम्पियन संभाजी राक्षे, माजी सरपंच राजाभाऊ जाधव, पिंपरी-चिंचवड कुस्ती संघाचे सचिव संतोष माचुत्रे, राजेश भुजबळ, दत्तात्रय पायगुडे, किसन आमले, विलास जाधव, दत्तात्रय शिंदे, साहेबराव जाधव, हभप. तुकाराम दातिर, अविनाश खानेकर, हभप. निवृत्ती महाराज बोरकर (शास्त्री), दिनेश पिंजन, माजी सैनिक रामदास मदने, राहुल जाधव आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. साहेबराव जाधव यांनी सुत्रसंचालन केेले. कैलास जाधव यांनी मान्यवरांचे आभार मानले. शिव वंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

या वारकऱ्यांचा झाला विशेष सन्मान

पूणे ते पंढरपूर पायी दिंडी सोहळयात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या विशेष व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये माऊली रथामागे असणारे ह.भ.प. तात्या महाराज बोरकर, पंढरपुरातील विठ्ठल मंदीरावर अनेक वर्षांपासून मोफत नेत्रदीपक विद्युत रोषणाई करणारे विनोद जाधव, आळंदी-पंढरपुर निर्मल वारीतील संयोजक संदिप जाधव, पुणे ते पंढरपूर सायकल वारी करणारे रामदास पायगुडे व मित्र परिवार इत्यादींचा सन्मान झाला.

वारकरी आखाडयाला १४ वर्षांची परंपरा

श्री समर्थ विष्णुदास वारकरी महावीर कुस्ती स्पर्धेचा आखाडा वाखरीत १४ वर्षांपासून भरत आहे. एमआयटी संस्था व विश्वशांती केंद्र या स्पर्धेचे आयोजन करते या आखाडयात विविध सहा वजनी गटातील सुमारे शंभरहून अधिक महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातील व दिंडीत पायी चालणारे वारकरी मल्ल दाखल होतात. या मल्लांच्या सुमारे पन्नासहून अधिक चुरशीच्या कुस्त्या वैष्णवांच्या डोळ्यांचे पारणे फेडण्याबरोबर त्यांच्या प्रवासाचा सीन, थकवा नाहीसा करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com