धक्कादायक! व्हॉटस्अपवर व्हिडिओ पाठवून वॉचमनने केला आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

वैभव साठे याने कंपनीतील सुरक्षारक्षक हे लोकडाऊनच्या काळात घरी असतानाही सुरक्षारक्षकाच्या पगारातील काही पैसे काढून घेतले. याबाबत सुरक्षराक्षकाने त्यांचे वरिष्ठ चौगुले यांच्याकडे तक्रार केली.

पिंपरी : लॉकडाऊनमध्ये सुरक्षारक्षक घरी असतानाही कंपनीतील सुपवायझरने त्यांच्या पगारातील पैसे काढून घेतले. याबाबत सुरक्षराक्षकाने वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर सुपरवायझरकडे तक्रारीची चौकशी सुरू असताना सुप्रवायझरने इतर वरिष्टांना आत्महत्या करीत असल्याचा व्हिडिओ व चिठठीचा फोटो व्हाट्सअपद्वारे पाठवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बोपखेल येथे घडली. 

वैभव रंगनाथ साठे (वय 31, रा. गणेशनगर, बोपखेल) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या सुप्रवायझरचे नाव आहे. याप्रकरणी इंद्रजित महावीर चौगुले (रा. वास्तू उद्योग मासुळकर कॉलनी , पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वैभव साठे याने कंपनीतील सुरक्षारक्षक हे लोकडाऊनच्या काळात घरी असतानाही सुरक्षारक्षकाच्या पगारातील काही पैसे काढून घेतले. याबाबत सुरक्षराक्षकाने त्यांचे वरिष्ठ चौगुले यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीची चौकशी सुरू असताना साठे याने फिर्यादी चौगुले व त्यांच्या इतर वरिष्ठांना  आत्महत्या करीत असल्याचा व्हिडिओ व फोटो व्हाट्सअपद्वारे पाठवून आत्महत्येचा प्रयत्न केला. दिघी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात अंतिम वर्षाच्या परीक्षेची तयारी सुरू असताना कर्मचाऱ्यांनी काम बंद पाडले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Watchman attempted suicide by posting a video on WhatsApp