मावळ : वडिवळे धरणातून विसर्ग थांबविला 

दिनेश टाकवे
Sunday, 30 August 2020

नाणे मावळात टाटा कंपनीच्या धरणांशिवाय सरकारचे वडिवळे प्रकल्प हे महत्त्वाचे धरण आहे.

करंजगाव (मावळ) : अतिवृष्टीचा तालुका म्हणून मावळ तालुक्‍याला ओळखले जाते. नाणे मावळात टाटा कंपनीच्या धरणांशिवाय सरकारचे वडिवळे प्रकल्प हे महत्त्वाचे धरण आहे. सध्या धरणात 89.17 टक्के भरले असून, त्यातून होणारा पाण्याचा विसर्ग रविवारी (ता. 30) थांबविण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या धरणावर सुमारे शंभर गावांची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. उपलब्ध असलेल्या या पाणीसाठ्यामुळे पुढील वर्षभराची टंचाई निर्माण होणार नाही. याशिवाय धरण पूर्ण भरल्यानंतरच धरणातून पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती अभियंता मनोहर खाडे यांनी दिली.

वडिवळे धरणातून नाणे मावळातील उकसाण, गोवित्री, करंजगाव, नाणे, कामशेत, वाड्या-वस्त्यांसह वडगाव ते तळेगाव आणि देहू ते आळंदीपर्यंत पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नाणे मावळसह अनेक गावांच्या दृष्टीने हे धरण अत्यंत महत्त्वाचे आहे. दरम्यान धरणातून सोडला जाणारा पाण्याचा विसर्ग रविवारी थांबवण्यात आला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water discharged stopped from vadivale dam