

Seven-Year Mystery: Persistent Leakage Turns Grade Separator Risky
sakal
-आशा साळवी
पिंपरी : चिंचवड स्टेशन, पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ग्रेडसेपरेटरच्या (समतल विलगक) भिंतीमधून सतत पाणीगळती होत आहे. यामुळे भिंत कमकुवत होण्यासह दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. तसेच रस्त्यावर पाणी साचून वाहनांचा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. महापालिकेकडे नागरिकांनी तक्रार करूनही पाणीगळतीचे कारण सापडलेले नाही. तर महापालिका अधिकारी समाधानकारक उत्तर न देता थेट तक्रार बंद करत असल्याचे नागरिकांनी सांगितले.