
Pimpri Chinchwad News
Sakal
जुनी सांगवी : जुनी सांगवी परिसरात अगोदरच दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना मागील दोन ते तीन महिन्यांपासून जयमालानगर, अभिनवनगर, पवनानगर, संगमनगर, ममतानगर भागांत कमी दाबाने पाणी मिळत आहे. पाणीपुरवठ्याच्या वेळा मागे-पुढे होत आहेत. त्यातच कधी विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.