esakal | पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी कोणत्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार, वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी कोणत्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार, वाचा

जलवाहिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी भोसरीगाव, चऱ्होली, इंद्रायणीनगर, डुडुळगाव, दिघी, वडमुखवाडी, चोविसावाडी या भागातील पाणीपुरवठा गुरुवारी (ता. 15) बंद ठेवण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी कोणत्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार, वाचा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : जलवाहिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी भोसरीगाव, चऱ्होली, इंद्रायणीनगर, डुडुळगाव, दिघी, वडमुखवाडी, चोविसावाडी या भागातील पाणीपुरवठा गुरुवारी (ता. 15) बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या भागांमध्ये गुरुवारी सकाळी नऊपासून रात्री उशिरापर्यंतचा पाणीपुरवठा होणार नाही. शुक्रवारी (ता. 16) सकाळचा पाणीपुरवठाही अनिमित व कमी दाबाने होण्याची शक्‍यता महापालिकेच्या 'क' व 'ई' क्षेत्रीय कार्यालय अधिकाऱ्यांनी वर्तविले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिकेच्या 'क' व 'ई' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य जलवाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीची कामे गुरुवारी केली जाणार आहेत. 'क' क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रात भोसरी गावठाण, इंद्रायणीनगर, पुणे-नाशिक महामार्ग, लांडेवाडी, शांतीनगर आदी भागांचा समावेश होतो. 'ई' क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रात चऱ्होलीगाव, बुर्डेवस्ती, डुडुळगाव, वडमुखवाडी, चोविसावाडी, पठारे मळा, ताजणे मळा, चऱ्होली फाटा, काळजेवाडी, दाभाडेवस्ती, मॅग्झीन कॉर्नर, दिघी, भारतमाता नगर, सॅंडविक कॉलनी, चक्रपाणी वसाहत या भागांचा समावेश होतो. या परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांची देखभाल-दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या भागांमध्ये गुरुवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत पाणीपुरवठा होईल. त्यानंतर पाणीपुरवठा यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

महापालिकेच्या निगडी प्राधिकरण सेक्‍टर 23 मधील जलशुद्धीकरण केंद्रातून शहरात पाणी वितरण केले जाते. त्यासाठी ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्‍या उभारल्या आहेत. त्यातून पाणी वितरण करणाऱ्या 'क' व 'ई' क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील वाहिन्यांची देखभाल-दुरुस्ती गुरुवारी केली जाणार आहे. 'क' व 'ई' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत भोसरी, इंद्रायणीनगर, संत तुकारामनगर भोसरी, दिघी मॅगझीन कॉर्नर, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली व वडमुखवाडी येथील टाक्‍या येतात. त्यावरून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठ्याची सर्व यंत्रणा बंद ठेवल्यामुळे 'क' व 'ई' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या आठही टाक्‍यांवरून पाणीपुरवठा होणाऱ्या भागात दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (ता. 16) अनियमित व कमीदाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करावा, असे आवाहन दोन्ही कार्यालयांच्या पाणीपुरवठा विभागांनी केले आहे.