पिंपरी महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग म्हणतोय, 'उलट्या, जुलाब पाण्यामुळे नाहीत'

पिंपरी महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग म्हणतोय, 'उलट्या, जुलाब पाण्यामुळे नाहीत'

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या बहुतेक भागांमधून उलट्या, जुलाब व पोटदुखीचे रुग्ण वाढत असल्याच्या तक्रारी महापालिकेस प्राप्त होत आहेत. ज्या ठिकाणांहून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या भागातील पाण्याची तपासणी केली असता वितरण व्यवस्थेतील पाणी सुरक्षित व पिण्यायोग्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून शहरात अतिसाराचे रुग्ण आढळून आल्याने शहरातील 42 ठिकाणाहून नागरिकांनी पाणीपुरवठा दूषित असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. त्यात सर्व ठिकाणी क्लोरीन आढळून आला आहे. पाण्यात सुरक्षित प्रमाणात क्लोरीन असणे, ही पाणी सुरक्षित व पिण्यायोग्य असल्याची खूण आहे. पाण्यात कोणतेही अपायकारक जिवाणू, विषाणू नाहीत याची खातरजमा करण्यासाठी पाण्याचे नमुने घेऊन अणु जीव चाचण्याही घेण्यात आल्या आहेत. त्यातही वितरण व्यवस्थेतील पाणी सुरक्षित व पिण्यायोग्य असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बाहेरील प्रयोगशाळेतूनही खातरजमा करण्यात आली आहे. त्यासाठी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. उलट्या, जुलाब व पोटदुखीचे कारण विषाणूजन्य ( Viral)अथवा अन्य कारणेही असू शकतात. त्या दृष्टीकोनातून प्रत्यक्ष कारण शोधण्यासाठी उलट्या, जुलाब, पोटदुखी असणाऱ्या आजारी व्यक्तींच्या आवश्यक त्या चाचण्या करण्यात येतील. या सर्व पार्श्वभूमीवर सर्व पिंपरी चिंचवडवासीयांना काळजी घेण्याचे आवाहन, पाणी पुरवठा व जल नि:सारण विभागाचे रामदास तांबे यांनी केले आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अशी घ्या काळजी... 

  1. पिण्याचे पाणी उकळून थंड करून प्यावे. पाणी व्यवस्थित झाकून ठेवावे.
  2. ताजे अन्न पदार्थ खावेत. शिळे अन्न खाऊ नये.
  3. अन्न पदार्थ झाकून ठेवावेत.
  4. उघड्यावरील तसेच, बाहेरील अन्न पदार्थ खाऊ नयेत.
  5. फळभाज्या, पालेभाज्या व्यवस्थित स्वच्छ धुवून, व्यवस्थित शिजवून खाव्यात.
  6. जेवणापूर्वी तसेच, शौचाहून आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
  7. घर व परिसर स्वच्छ ठेवावे, जेणेकरून माश्या होणार नाहीत.
  8. जमिनीवरील पाण्याची टाकी तसेच, इमारतीवरील पाण्याची टाकी स्वच्छ असल्याबाबत खातरजमा करून त्यावर झाकण व्यवस्थित असल्याची खात्री करावी.
  9. आपल्याला गढूळ पाणी येत असेल व कोठेही पाण्याची गळती दृष्टीस पडल्यास त्वरित सारथी हेल्पलाईन क्रमांक 8888006666 वर कळवावे.
  10. कोरोना-कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर सरकार तसेच, महापालिकेच्या निर्देशांचे पालन करावे.
  11. कोरोनाशी लढण्यासाठी तोंडाला व नाकाला मास्क लावण्यात सर्वांचेच हित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com