पिंपरी-चिंचवडकरांनो महत्त्वाची बातमी; गुरुवारी राहणार पाणीपुरवठा बंद 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 September 2020

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) रावेत येथील जलउपसा व शुद्धीकरण केंद्रातील देखभाल-दुरुस्तीची कामे गुरुवारी (ता. 10) सकाळी सहा ते सायंकाळी आठ या कालावधीत केले जाणार आहेत.

पिंपरी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) रावेत येथील जलउपसा व शुद्धीकरण केंद्रातील देखभाल-दुरुस्तीची कामे गुरुवारी (ता. 10) सकाळी सहा ते सायंकाळी आठ या कालावधीत केले जाणार आहेत. त्यामुळे एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा बंद राहील. तसेच, शुक्रवारी (ता. 11) कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होण्याची शक्‍यता आहे. त्याचा परिणाम एमआयडीसी क्षेत्रासह पिंपरी, चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी, सीएमई, आर. ऍण्ड डी., व्हीएसएनएल, दिघी, तळवडे, चाकण, देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड, ओएफडीआर या निवासी व लष्करी भागातही होणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पवना नदीवरील रावेत बंधारा येथे एमआयडीसीसह महापालिकेचेही अशुद्ध जलउपसा केंद्र आहे. महापालिका प्रतिदिन 480 दशलक्ष (एमएलडी) लिटर पाणी उचलते आणि एमआयडीसीकडून प्रतिदिन 30 दशलक्ष लिटर पाणी विकत घेते. एमआयडीसीलगतच्या निवासी भागात या पाण्याचे वितरण केले जाते. विशेषतः भोसरी एमआयडीसीतील वसाहती, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी या भागात पाणीपुरवठा केला जातो. 

लोणावळेकरांनो खबरदार ! बंगले भाड्याने देणार असाल, तर ही बातमी वाचा

गेल्या गुरुवारी महापालिकेने त्यांच्या अशुद्ध जलउपसा केंद्राच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवला होता. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी व शुक्रवारी सकाळी पाणी मिळू शकले नाही. मात्र, शुक्रवारी रात्री सुमारे एक तास आणि शनिवारी सायंकाळी अर्धा तास वीजपुरवठा खंडित झाल्याने काही भागात पाणी मिळू शकले नाही. आता एमआयडीसीकडून देखभाल दुरुस्ती केली जाणार असून, त्यांच्यावर अवलंबून असलेल्या भागातील नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water supply from midc shut down in pimpri chinchwad on thursday 10 august 2020