
Pimpri Water Crisis
Sakal
पिंपरी : महापालिका निवडणूक जवळ येऊ लागली आहे. तशी इच्छुकांना मतदारांशी संबंधित प्रश्न, समस्या, अडचणी आठवू लागल्या आहेत. त्यासंदर्भात पत्रके काढून अधिकाऱ्यांना देऊन ‘आम्हीच तुमचे प्रश्न सोडवू’ अशा अविर्भावात हे इच्छुक मतदारांमध्ये मिरवत आहेत. यातील ‘ज्वलंत’ विषय म्हणजे गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेला, सर्वांनीच दृष्टिआड केलेला आणि महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ‘आठवण’ झालेला ‘दिवसाआड पाणीपुरवठा’ सुरळीत करणे आणि विविध समस्या सोडविण्याचा मुद्दा चर्चेत आहे.