भावांनो, लॉकडाउन आहे तोपर्यंत लग्न घ्या उरकून; नाहीतर...

भावांनो, लॉकडाउन आहे तोपर्यंत लग्न घ्या उरकून; नाहीतर...
Updated on

पिंपरी : कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यात मोठ्या प्रमाणात विवाह मुहूर्त हुकले; पण सरकारने लग्नसोहळ्यांवर निर्बंध कमी केले आणि लग्नाची जुनी परंपरा परत आली. केवळ मोजक्‍याच नातेवाइकांनाच उपस्थितीत अगदी आपल्या घरासमोरच अंगणात, कोणी छतावर, तर कोणी हॉल अथवा गार्डनमध्ये कार्यक्रम करत आहेत. परिणामी कमी खर्चात उरकणारा वाढता घरगुती लग्नाचा 'ट्रेंड' वधू पित्यासाठी काहीसा दिलासा देणारा ठरत आहे.

सर्वसामान्य कुटुंबाला विवाह सोहळा कर्ज काढूनच करावा लागतो. मात्र, अशा थाटामाटात होणाऱ्या लग्न सोहळ्यास 2020 हे वर्ष अपवाद ठरले आहे. या कोरोनामुळे उदयास आलेली नवीन लग्न पद्धती समाजाला हितकारक ठरत आहे. विशेष म्हणजे लग्न सोहळ्यात वधुपित्याला नातेवाइकांचे "नखरे' सहन करता करता नाकीनऊ यायचे, अशातच सरकारने लॉकडाउनच्या नियमांमध्ये सूट देत लग्नास परवानगी दिल्यानंतर लग्नाची जुनी परंपरा परत आली आहे. केवळ जवळच्या मोजक्‍याच नातेवाइकांनाच बोलवत आहेत. साधेपणाने आणि कमीत कमी दहा ते पंधरा नातेवाइकांच्या उपस्थितीमध्ये घराच्या अंगणात, छतावर, लॉन अथवा गार्डनमध्ये कार्यक्रम करत आहेत. डेकोरेशनचा काहीसा खर्च वाचला आहे. कमी खर्चात लग्न उरकत असल्याने आता पाहुण्यांना मास्क, सॅनिटायझरची देखील सवयीचे झाले आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आता लग्नासाठी एक छोटासा चांगला मंडप अंगणातच थाटला जात आहे. तिथेच हळद खेळणे, हळद उतरवणे असे कार्यक्रम उरकण्यात येत आहेत. एरवी सामान्य नागरिकदेखील मुलीच्या लग्नासाठी चार ते पाच लाख रुपयांचे कर्ज काढणे, हॉलचे बुकिंग, वऱ्हाडी मंडळीचा खर्च यामुळे वधूपित्यांची धांदल उडायची, मात्र, लॉकडाउनमध्ये या तीन महिन्यात घरासमोरच मोजक्‍या लोकांमध्ये लग्न पार पडत असल्याने एकूण 40 ते 50 हजार रुपये खर्च येत आहे. आकुर्डी- विद्यानगरमधील महादेव सावंत आणि आरती बनसोडे यांचेही अशाच पद्धतीने विवाह पार पडला. लग्नात मोजकीच लोक सहभागी होत असल्याने इतर नातेवाईक फेसबुक, यु-ट्यूब आणि इंस्टाग्राम लाइव्हद्वारे सहभागी होत असल्याचे वधूपिता संतोष बनसोडे यांनी सांगितले. एकूणच लॉकडाऊन काळातील लग्नसोहळा समाजाला व सामान्य, गरीब कुटुंबाला तारक ठरत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com