जुनी सांगवीकर म्हणतायेत, 'आम्ही गणेशोत्सवात नियम पाळतोय पण...' 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 August 2020

सध्या परिसरात सर्व नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा होत आहे. मात्र, बाप्पाचे विसर्जन करायचे कसे, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. 

जुनी सांगवी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. तसेच, मिरवणुका व घाटावरील विसर्जनावर बंधने घातली आहेत. सध्या परिसरात सर्व नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा होत आहे. मात्र, बाप्पाचे विसर्जन करायचे कसे, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिका प्रशासनाकडून पुण्याच्या धर्तीवर फिरत्या विसर्जन हौदाची पहिल्या दिवसापासून मागणी केली होती. मात्र, जुनी सांगवी परिसरात विसर्जन घाट बंद करण्याखेरीज प्रशासनाकडून काहीही उपाययोजना न केल्याने बाप्पाचे विसर्जन कसे करावे, असा प्रश्‍न नागरिकांसमोर उभा राहिला आहे. शहर व उपनगरात विविध भागात विविध दिवशी गणरायाचे विसर्जन होत असते. अनंत चतुर्दशीपर्यंतचे विसर्जनाबाबत नियोजन करणे आताही शक्‍य आहे. परंतु, तशी हालचाल दिसत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, पवना, मुळा व इंद्रायणी नद्यांच्या विविध घाटांवर बंदी असूनही गणपती विसर्जन झाल्यास व त्यातून कोरोनाचा संसर्ग वाढलाच तर त्यास कोण जबाबदार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुण्याच्या धर्तीवर नियोजन करणे गरजेचे असताना कुठलीही उपाय योजना केली नाही. यामुळे नागरिकांची कुचंबणा होणार आहे. 
- प्रशांत शितोळे, सीझन वेल्फेअर ट्रस्ट 

याबाबत प्रशासनाकडून पहिल्या दिवसापासून उपाययोजना करणे गरजेचे होते. तसेच, पालिका आयुक्तांना लेखी निवेदनही दिले आहे. 
- हर्शल ढोरे, नगरसेवक 

मंडळांचे अध्यक्ष म्हणतात... 

महापालिकेने उपाययोजना न करून कोरोनाच्या संकटात उत्सवावर गदा आणली आहे. 
- गणेश ढोरे, मधुबन मित्र मंडळ 

प्रशासनाने उत्सवाबाबत नियमावलीची माहिती दिली. परिस्थिती लक्षात घेऊन आमच्या मंडळाने उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, घरगुती बाप्पाच्या विसर्जनाचे काय, असा प्रश्न आहे. 
- संजय मराठे, सुयोग कॉलनी मित्र मंडळ 
 

Edited by Shivnanda Baviskar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Where to immerse ganesh idols asked old sangavi citizens