esakal | लाच प्रकरणातील ‘ते’ १६ कोण?
sakal

बोलून बातमी शोधा

PCMC

लाच प्रकरणातील ‘ते’ १६ कोण?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : महापालिका स्थायी समितीमधील लाच प्रकरणात अध्यक्षांच्या स्वीय सहायकाने ‘वर सोळा जणांना पैसे द्यावे लागतात,’ असे तपासात सांगितले होते. त्यामुळे ‘ते’ सोळा कोण? याची उत्सुकता होती. आता या प्रकरणातील पाचही जणांना जामीन मिळाला आहे. त्याच्या सुनावणी दरम्यान, ‘या गुन्ह्याचा तपास प्राथमिक स्तरावर आहे. तपासादरम्यान ‘ते’ सोळा जण कोण आहेत, हे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडे चौकशी करणे गरजेचे आहे,’ असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केला. त्यामुळे ‘ते’ सोळा कोण? याची चर्चा पुन्हा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे. ‘स्थायी’ची साप्ताहिक बैठक उद्या (बुधवार) आहे. ‘त्या’ सोळांच्या उल्लेखाने कामकाजात विघ्न येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: प्रभाग रचनेचा आराखडा तयार करताना राजकीय हस्तक्षेप टाळण्याचे आव्हान

महापालिका तिजोरीच्या चाव्या स्थायी समितीकडे असतात, असे म्हटले जाते. कारण, कोणताही खर्च आणि अन्य विषय समित्यांचे विषय येथूनच नजरेखालून जात असतात. कोणते विषय मंजूर करायचे. कोणते तहकूब ठेवायचे. कोणते दप्तरी दाखल करायचे. कोणत्या विषयावर खुलासा मागवायचा, याचे सर्वाधिकार समितीला असतात. इतकेच नव्हे तर महापालिकेचा वर्षाचा अर्थसंकल्पसुद्धा आयुक्त प्रथम या समितीकडेच सुपूर्द करत असतात. मात्रा, आता गेल्या पंधरा दिवसांपासून कार्यालयच ‘सील’ झाले आहे. तिकडे कोणी फिरकतही नाही. एरवी रात्री उशिरापर्यंत खुले असणारे कार्यालय आता कुलूप बंदच आहे. कारण, १८ ऑगस्ट रोजी अध्यक्षांचे स्वीय सहायक ज्ञानेश्‍वर पिंगळे यांच्यासह चार कर्मचाऱ्यांना व अध्यक्षांना ठेकेदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी अटक झाली होती.

हेही वाचा: पिंपरी : पाणीपुरवठ्यासाठी नागरिकांचे निगडीत आंदोलन

सोमवारी न्यायालयाने सर्वांची जामिनावर सुटका केली. त्यापूर्वी झालेल्या सुनावणीत सरकारी वकिलांनी ‘ते’ सोळा जण कोण आहेत, हे स्पष्ट झाल्याचा युक्तिवाद केला होता. त्यामुळे सर्वांचे लक्ष ‘सोळा’ जणांकडे वळले आहे. कारण, समितीवर १६ नगरसेवक आहेत. त्यात एक अध्यक्ष आहे. या १६ जणांमध्ये १० सत्ताधारी भाजपचे, चार सदस्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे, एक सदस्य शिवसेना व एक सदस्य अपक्ष आहे. त्यामुळे त्‍यात ‘या’ सोळा जणांचा समावेश आहे की, अन्य कोणी आहेत. त्यात कोणी अधिकारी आहे की, महापालिका बाहेरील राजकीय शक्ती आहे. याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

हेही वाचा: जगण्यातील संघर्षाने दाखवली वृद्धाश्रमाची वाट

यापूर्वी अध्यक्षांना मारहाण

समितीत टक्केवारी चालते असे नेहमीच म्हटले जाते. त्यावर आता घडलेल्या लाच प्रकरणाने शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, त्यापूर्वी अर्थात दीड वर्षापूर्वी ‘स्थायी’च्या दोन सदस्यांनी थेट अध्यक्षांनाच मारहाण केली होती. ते प्रकरणही टक्केवारीच्या वाट्यावरूनच घडल्याची चर्चा आहे.

loading image
go to top