पिंपरी महापालिकेतील आगामी विरोधी पक्षनेता कोण?, राष्ट्रवादीकडून हे पाच जण इच्छुक 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 September 2020

  • राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पाच जण इच्छुक 

पिंपरी : महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पाच जण इच्छुक आहेत. त्यापैकी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, याची उत्सुकता वाढली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राष्ट्रवादी कॉंग्रेसला 2017 च्या महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच विरोधात बसावे लागले. मात्र, पक्षातील बहुतांश कार्यकर्त्यांना विरोधी पक्ष नेतेपदाचा अनुभव मिळावा, यासाठी पाच वर्षांत पाच जणांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार योगेश बहल, दत्ता साने व नाना काटे यांनी पद भूषविले आहे. काटे यांचा एक वर्षांचा कार्यकाल संपल्याने त्यांनी नुकताच महापौर उषा ढोरे यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला आहे. आता अजित गव्हाणे, राजू मिसाळ, डॉ. वैशाली घोडेकर, विनोद नढे, संतोष कोकणे इच्छुक आहेत. 

शैक्षणिक संस्थाचालक म्हणतायेत, 'खर्च भागवायचा तरी कसा?' 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपला तोडीसतोड नेतृत्व असलेल्या व्यक्तीकडे विरोधी पक्षनेता पद देण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले, ""विरोधी पक्षनेता निवडीबाबत पक्षाची बैठक शनिवारी (ता. 5) झाली. त्याचा अहवाल पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठविला आहे. त्यांच्याकडून सूचविलेले नाव नगरसचिवांकडे दिले जाईल. ते विभागीय आयुक्तांना कळवतील. त्यानंतर महापौर विरोधी पक्ष नेत्याच्या नावाची घोषणा करतील.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who is the next Leader of Opposition in Pimpri Chinchwad Municipal Corporation