"घराघरांत शिवसेना का पोचली नाही?"

शिवसेना नेते खासदार राऊत यांचा शहरातील कार्यकर्त्यांना सवाल
शिवसेना नेते खासदार राऊत
शिवसेना नेते खासदार राऊत

पिंपरी : ‘‘प्रत्येक वेळी घराघरांत शिवसेना पोचली पाहिजे, अशी घोषणा देता, मग आतापर्यंत या भागातील घराघरांत शिवसेना का पोचली नाही? भोसरीत आपला एकही नगरसेवक नाही. गेल्या वेळच्या महापालिका निवडणुकीत चार सदस्यांचा प्रभाग होता, त्याचा फटका बसला म्हणता. मग, भाजपला का फटका बसला नाही. आपण लोकांपर्यंत पोचण्यात कमी पडलो. आपण ढिसाळ काम केले,’’ अशा शब्दांत शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कान टोचले.

आगामी नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर शिरूर लोकसभा आणि पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी (ता. २६) भोसरीत झाला. त्यावेळी राऊत बोलत होते. पक्षाचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर, जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार श्रीरंग बारणे, राज्य संघटक गोविंद घोळवे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, शहरप्रमुख सचिन भोसले, महिला आघाडीच्या जिल्हासंघटक सुलभा उबाळे आदी उपस्थित होते.

शिवसेना नेते खासदार राऊत
विद्यार्थ्यांच्या हितासाठीच आरोग्य भरतीची परीक्षा पुढे ढकलली - राजेश टोपे

महापालिका निवडणुकीत आपल्या फुग्यातली हवा का जाते?, असा प्रश्‍न उपस्थित करत भोसरीतून साथ मिळाली असती तर, गतवेळी आपली शिरूरची खासदारकी गेली नसती, शिवाजीराव आढळराव पाटील आज दिल्लीत असते, अशी खंत व्यक्त करत राऊत यांनी महापालिकेवर भगवा फडकावण्यासाठी भोसरीत जोरात कामाला लागण्याचा आदेश दिला. दोन महिन्यांपूर्वी शहरात आले तेव्हा त्यांनी ५० नगरसेवक निवडून आले, तरी महापौर शिवसेनेचाच होईल, असा दावा केला होता. आता ४०-४५ नगरसेवक निवडून आले तरी महापालिकेवर भगवा फडकेल, असा दावा करत कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचा प्रयत्न केला.

शिवसेना नेते खासदार राऊत
विद्यार्थ्यांच्या हितासाठीच आरोग्य भरतीची परीक्षा पुढे ढकलली - राजेश टोपे

प्रत्येकाने एक नगरसेवक निवडून आणा

महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे एकटे दहा नगरसेवक निवडून आणू शकतील. खासदार श्रीरंग बारणेसुद्धा दहा नगरसेवक निवडून आणू शकतील. फक्त थोडा जोर लावा, अशा शब्दांत कलाटे व बारणे यांना गोंजारण्याचा प्रयत्न राऊत यांनी केला. कारण, त्यांच्यातील वैचारिक मतभेत सर्वश्रृत आहेत. स्टेजवरील गर्दीकडे पाहात राऊत म्हणाले, ‘‘यातील प्रत्येकाने एकेक नगरसेवक निवडून आणला तरी ४०-४५ होतील आणि महापौर आपलाच असेल. कारण, महापालिकेत शिवसेना घासून नाहीतर ठासून काम करणार आहे. त्यासाठी नवीन चेहरे शिवसेनेत आणा. स्वतःबरोबर पक्षाचाही विचार करा.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com